व्हॉट्सॲपची नव्या वर्षात कात! 

ऋषिराज तायडे
Wednesday, 9 December 2020

नवनवीन आणि आकर्षक फीचर्स देत युजर्सना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न व्हॉट्‌सॲपकडून सातत्याने केला जातो.येत्या नव्या वर्षातही व्हॉट्‌सॲपने अनेक नवे फीचर्स आणले आहेत.जाणून घेऊया नव्या फीचर्सविषयी थोडक्‍यात

जगातील सर्वाधिक वापरात असलेले समाज माध्यम म्हणून व्हॉट्‌सॲप ओळखला जातो. नवनवीन आणि आकर्षक फीचर्स देत युजर्सना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न व्हॉट्‌सॲपकडून सातत्याने केला जातो. अशाच प्रकारे येत्या नव्या वर्षातही व्हॉट्‌सॲपने अनेक नवे फीचर्स आणले आहेत. जाणून घेऊया नव्या फीचर्सविषयी थोडक्‍यात...

 इमोजी आणि वॉलपेपर्स 
व्हॉट्‌सॲपच्या येणाऱ्या नव्या अपडेटमध्ये अनेक नवे इमोजी आणि वॉलपेपर्स दिले जाणार आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर्स वापरण्याची सुविधा मिळणार आहे. ‘डब्ल्यूएबीटाइन्फो’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना ६१ नवे वॉलपेपरचे पर्याय मिळणार आहेत. त्यातही ब्राइट, डार्क, कस्टम, सॉलिड कलरचे वॉलपेपर्सही असणार आहे. तसेच, व्हॉट्‌सअॅप अनेक नवनवीन इमोजी आपल्या प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. 

गॅजेट्स : वेध 5G मोबाईल्सचे...

 रेल्वेची माहिती व्हॉट्‌सॲपवर 
व्हॉट्‌सॲपचा वाढता वापर लक्षात घेता आता रेल्वेचे वेळापत्रक, पीएनआर क्रमांक, रेल्वेगाडीच्या स्टेटसबाबत इत्थंभूत माहिती आता व्हॉट्‌सॲपवरही मिळणार आहे. त्यासाठी ‘रेलओफाई’ हे ॲप व्हॉट्‌सॲपला लिंक करावे लागेल. त्यानंतर +९१-९८८११९३३२२ हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून व्हॉट्‌सॲपवरून या क्रमांकावर तुमचा पीएनआर क्रमांक पाठविल्यास तुमच्या रेल्वेगाडीबाबतची सर्व माहिती व्हॉट्‌सॲपवर उपलब्ध होईल. 

 व्हॉट्‌सॲपवरही येणार जाहिराती 
सध्या जगभरात व्हॉट्‌सॲपचे १.५ अब्जाहून अधिक युजर्स आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या युजर्सपर्यंत एखाद्या उत्पादनाची माहिती पोहोचवायची असल्यास हा मंच नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. त्या उद्देशानेच आता व्हॉट्‌सॲपवरही जाहिराती दिसण्याची शक्‍यता आहे. येत्या वर्षात ही सुविधा सुरू झाल्यास व्हॉट्‌सॲपवरील रिकाम्या जागी या जाहिराती दिसतील, अशी चर्चा आहे. या जाहिराती युजर्सच्या आवडी-निवडीनुसार असतील, अशी माहिती एका तंत्रविषयक संकेतस्थळाने  दिली आहे.

व्हॉट्‌सॲपवरूनही आर्थिक व्यवहार!

    ...तर व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट 
व्हॉट्सॲप येत्या वर्षात त्यांची ‘टर्म्स ऑफ सर्व्हिस’ अपडेट करणार आहे. त्याद्वारे युजर्सवर काही अटी घातल्या जाणार असून, त्या  स्वीकाराव्या लागणार आहेत. युजरला या अटी स्वीकारायच्या नसल्यास त्यांना त्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट करावे लागणार आहे. व्हॉट्सॲपच्या या नव्या अटी ८ फेब्रुवारी २०२१पासून लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘डब्ल्यूएबीटाइन्फो’ने दिली आहे. मात्र, या नव्या अटी नेमक्‍या काय असतील, याबाबत अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rushiraj tayade write article about whatsapp new feature

Tags
टॉपिकस
Topic Tags: