Friendship 
युथ्स-कॉर्नर

गोष्ट मैत्रीची : एकमेवाद्वितीय मैत्री...

समृद्धी तवले

मला बारावीनंतर डिग्रीसाठी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात प्रवेश मिळाला. पहिल्यांदाच घराबाहेर, हॉस्टेलला राहायला गेले. खरंतर बारवीपर्यंत मला कोणीच जवळचे मित्र-मैत्रिणी नव्हते. लहानपणापासूनच मी इन्ट्रोव्हर्ट आहे. ८ ऑगस्ट २०१६, सिनियर कॉलेजचा पहिला दिवस. त्यादिवशी बाकावर एकटीच बसलेली असताना वर्षा शेजारी येऊन बसली आणि मला आयुष्यभरासाठी सगळ्यात जवळचं ‘मैत्र’ मिळालं. मीरा बोरवणकर यांच्या ‘माझ्या आयुष्याची पाने’ या पुस्तकात एक वाक्य वाचायला मिळालं - ‘जगात सर्वांत एकाकी स्त्री ती असते जिला जवळची मैत्रीण नसते,’ आणि ते किती खरं आहे हे मला मैत्रीण मिळाल्यावर जाणवलं. वर्षा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील मुलगी. स्वच्छ कोल्हापुरी भाषा बोलणारी. तिचं सूर लावून बोलणं कायमच ऐकत राहावंसं वाटतं. 

आम्ही कॉलेजमध्ये, मेसमध्ये, होस्टेलमध्ये कायम सोबत असायचो. दोघींपैकी एकजरी एखाद्या दिवशी एकटी फिरताना दिसली, तर हमखास चार जणांकडून तरी विचारणा व्हायचीच. आमच्या आयुष्यातले एकत्र असे सगळेच प्रसंग अविस्मरणीय आहेत. प्रत्येक सहल, स्टडी टूर वगैरेंच्या वेगळ्या अशा आठवणी आहेत. त्यातलीच सगळ्यात टॉपची एक सांगते.

तिसऱ्या वर्षाला असताना आमचा ‘एनएसएस’चा कॅम्प होता. रविवारी सकाळी जायचं ठरलं होतं. पडसाळी नावाचं एक छोटंसं खेडं. आम्ही दोघींनी भरपूर प्लॅन्स केले. भरपूर नवीन गोष्टी शिकून यायचं होतं. खारीचा वाटा’ म्हणता येईल अशी समाजसेवा करायला मिळणार होती. मी शुक्रवारी घरी (साताऱ्याला) आले आणि रविवारी कॅम्प निघायच्या आधी सकाळी परत कोल्हापूरला जाणार होते. पण काही कारणामुळं मला घरीच थांबावं लागलं. पुढच्या ८ दिवसाच्या कॅम्पच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी, पण तरीही होस्टेलला गेल्यावर मी ठरवलं, की शेवटचे २ दिवस कॅम्पला जायचंच. मी तिथं वर्षा सोडून कुणालाही ओळखत नव्हते, पण आश्चर्य म्हणजे तिथल्या सगळ्यांना मी आधीच माहिती होते! सगळ्यांची अशी प्रतिक्रिया होती, ‘‘तू आहेस होय ती...आल्यापासून आम्ही प्रत्येक गोष्टीत एकच नाव ऐकतोय.’’ असा हा प्रसंग खरंतर कडू गोड मिक्स असाच. कारण माझ्यासाठी तो सुखद धक्का होता आणि वर्षासोबत न गेल्याचं तर वाईट वाटत होतंच. तर अशी ही आमची मैत्री ‘एकमेवाद्वितीय’च!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT