युथ्स-कॉर्नर

टीएसएसएम बीएससीओईआर पॉलिटेक्निक, नऱ्हे येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार टीएसएसएम पॉलिटेक्निकमध्ये विज्ञान प्रदर्शन शोध २०२५

टीम YIN युवा

टी.एस.एस.एम.बी.एस.सी.ओ.ई.आर पॉलिटेक्निक कॉलेज, नऱ्हे यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५ (शोध २०२५) चे भव्य आयोजन दिनांक २६ व २७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले तब्बल १७५ नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प मांडण्यात आले असून, या उपक्रमात विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाची सविस्तर माहिती शोध २०२५ चे समन्वयक प्रा. एन. एस. मेटकर व प्रा. ए . ए.करंजे यांनी दिली. या प्रदर्शनास ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली असून, विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता यावेळी प्रकर्षाने दिसून आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एन.आय.इ चे हेमंत वंदेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "ज्ञान म्हणजे केवळ शिकणे नव्हे, तर ते प्रत्यक्षात उपयोगात आणणे व स्वतःच्या सर्जनशीलतेला चालना देणे असे प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे त्यांनी विशेष कौतुक करत त्यांना पुढील संशोधनासाठी प्रोत्साहन दिले.

यानंतर कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. आर. थिटे विद्यार्थ्यांना नवीन शोध व संशोधनाच्या दिशोने वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले.

यावेळी डॉ जी. ए. हिंगे यांनी बदलता काळ बदलती तंत्रज्ञान व्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) याविषयी सखोल माहिती देत. ए. आय. ची भीती न बाळगता त्याच्याशी मैत्री करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या समारंभात पॉलिटेक्निकच्या प्राचार्या डॉ. ए. एस. पाटील यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थी यशस्वी टेक्नोक्रॅट कसे बनू शकतात, याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती वंदना करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचे विद्यार्थी आर्या निमकर व तन्मय ब-हाणपूरकर यांनी केले तर संगणक विभागप्रमुख प्रा.एल.जे.वर्मा (संगणक विभागप्रमुख) यांनी आभार प्रदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, स्थापत्य विभाग प्रमुख प्रा.आर.बी. गव्हाणे , यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. व्ही. भागवत, विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. एस.एस. निकम, संगणक विभाग प्रमुख प्रा . एल.जे. वर्मा, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

अध्यक्ष तानाजी सावंत, माननीय सचिव गिरीराज सावंत आणि संस्थेचे विश्वस्त ऋषीराज सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गेले दहा वर्ष शोध राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन होत आहे अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक श्री.एन. एस. मेटकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT