युथ्स-कॉर्नर

भेलके महाविद्यालयात 'जागर संविधानाचा' कार्यक्रम उत्साहात साजरा...

टीम YIN युवा

नसरापूर (ता. भोर) – शंकरराव भेळके महाविद्यालय, नसरापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त 'यिन' सकाळ समूह व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "संविधान जागर" कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानातील प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा जागर केला.

या प्रसंगी प्रा. जाधवर डी एस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास व त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “भारतीय संविधान हे केवळ एक कायद्याचे दस्तऐवज नसून, सामाजिक न्याय व समतेचे प्रतीक आहे.”

कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जाधवर डी एस, डॉ प्रा. जगदीश शेवते आणि महाविद्यालय 'यिन' अध्यक्ष नितेश चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संविधान जागृतीचा संदेश दिला.

या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, आणि वक्तृत्व यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT