Yin's 7th anniversary celebrated in Nashik through social activities esakal
युथ्स-कॉर्नर

नाशिकमध्ये सामाजिक उपक्रमांतून यिनचा 7 वा वर्धापनदिन साजरा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : सकाळ माध्यम समूहाने तरुणाईच्या हक्काचे व्यासपीठ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (YIN) चा ७ वा वर्धापनदिन टाकळी रोड परिसरातील स्व. अनुराधा वि. धर्माधिकारी वृद्धाश्रम येथे आजी-आजोबांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.

तरुणांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी यिनच्या वर्धापनदिनाचे औचित्त्य साधून यिनचे महाविद्यालयीन प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

तरुणाईत नेतृत्व गुण घडावे याठी YIN ची स्थापना

तरुणाईत नेतृत्व गुण घडावे त्याचबरोरब शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने १९ ऑगस्ट २०१४ रोजी दै 'सकाळ' समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून यिन नेटवर्क ची स्थापना करण्यात आली. आज मुंबई पासून ते नागपूर आणि कोल्हापूर पासून जळगाव पर्यंत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधील विविध महाविद्यालयांत यिनचे लिडर्स काम करत आहेत. अनेक तरुणांनी यिनच्या माध्यमातून औद्योगिक, सामाजिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

नाशिक येथील टाकळी रोड परिसरातील स्व. अनुराधा वि. धर्माधिकारी वृद्धाश्रमात आजी-आजोबांसोबत YIN चा 7 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

प्रेरणा आणि ऊर्जा देणारं व्यासपीठ YIN

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना डगळे- वानखेडे, ॲड अर्जुन वानखेडे, हेमंत इसे यांनी सामाजिक भावनेतून केले. या निमित्ताने वृद्धाश्रमाला अन्न-धान्य, जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

''सकाळ समूहाच्या यिन व्यासपीठा तर्फे आयोजित वर्धापनदिन कार्यक्रमातील सामाजिक कार्यात सहभागी होता आले. यिन ने सुरू केलेल हे व्यासपीठ प्रेरणा आणि ऊर्जा देणारं आहे.'' ज्योत्स्ना डगळे - वानखडे , सामाजिक कार्यकर्त्या, समुपदेशक, नाशिक

वृद्धाश्रम संस्थेचे पदाधिकारी जॉन्सन निकाळजे, सॅमसन निकाळजे, इंदुमती निकाळजे, सकाळ यिनचे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे या कार्यक्रमास उपस्थित होते.

YIN वर्धापनदिनाच्या निमित्ताने सामाजिक भावनेतून वृद्धाश्रमाला अन्न-धान्य, जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

Latest Live Updates Marathi : राधानगरी भरले ९३ टक्के कोल्हापूर जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली

Ambernath: १२व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं, इसमाचं अमानुष कृत्य CCTVत कैद; अंबरनाथमधील घटनेने हळहळ

Power Bank Damage Signs : पॉवर बँक खराब होण्यापूर्वी देते 'हे' 5 इशारे; दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक

SCROLL FOR NEXT