पुणे : जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी येथे यिनतर्फे आयोजित ‘नवदुर्गा अभियान सन्मान’ सोहळ्यात सन्मानित महिला व उपस्थित मान्यवर.

 
युथ्स-कॉर्नर

यिनतर्फे ‘नवदुर्गा अभियान सन्मान’; कर्तृत्ववान महिलांचा गौरव.

टीम YIN युवा

समाजाला नेहमीच प्रेरणा देणाऱ्या आणि आदर्श ठरणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आणि जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त ‘नवदुर्गा अभियान सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विभागांत कार्यरत राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या डॉ. सोनल पाटील, स्वाती सुरवसे, डॉ. मीनाक्षी सोनावणे, सुनीता शिंदे, राजश्री थानके, नीलम गोनल, प्रद्युमी पटेल, गार्गी भिडे आणि हर्शिका शर्मा या नऊ महिलांना ‘नवदुर्गा अभियान’ अंतर्गत सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे, शिक्षक समन्वयक डॉ. संदीप रासकर, शिक्षकवर्ग आणि यिन क्लबचे सर्व विद्यार्थी सदस्य उपस्थित होते.

'आज विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर आणि त्यांच्याही पुढे जाऊन महिला चांगले कार्य करत आहेत. त्यांची प्रेरणा घेवून या समाजातील जास्तीत जास्त महिलांनी पुढे जावे, तसेच आजकालच्या काळात महिलांसाठी स्वसंरक्षण हा खूप महत्वाचा मुद्दा असून प्रत्येक स्त्रीने आपल्या मर्यादा पाळून आपले अस्तित्व सिद्ध करावे.
डॉ. आर. डी खराडकर कुलगुरू, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT