YIN Students
युथ्स-कॉर्नर

यिनच्या 'नेतृत्व विकास कार्यक्रम '२०२३' च्या पोस्टर अनावरण कार्यक्रम संपन्न

टीम YIN युवा

पुणे, ता २० - सकाळ माध्यम समूह आयोजित यिन नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत यिन निवडणूक प्रक्रिया नऊ जानेवारी २०२३ पासून तीन टप्प्यांत होत आहे. या 'नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या' पोस्टर चे अनावरण आज सकाळ माध्यम समूहाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर नवल तोष्णीवाल, यिनचे महाराष्ट्र व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार यांच्या हस्ते व पुणे यिन अधिकारी शंतनू पोंक्षे, यिन महाराष्ट्र समन्वयक अनिकेत मोरे, यिनचे माजी महसूलमंत्री रोहित आगळे, माजी सामाजिक न्यायमंत्री वैष्णवी खताळ तसेच अनेक महाविद्यालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात यिन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत असतात. या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध शाखेचे विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना यिन निवडणूकीसाठी मार्गदर्शन करत असतात. राज्यातील सर्व महाविद्यालयात पोस्टर्स, बॅनर, सोशल मिडियाच्या माध्यमातून निवडणूकीची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला पोहोचविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे यिन व्यासपीठ सज्ज झाले आहे.

राज्यातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधे नेतृत्वगुण विकसित करताना त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे महत्वपूर्ण काम सकाळ माध्यम समूहाचे 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात 'यिन' या व्यासपीठाद्वारे केले जाते. यिनच्या माध्यमातून नेतृत्व विकास कार्यक्रम अर्थात निवडणूक अथवा मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी यिन ॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. ॲपच्या माध्यमातून निवडणूक अर्ज दाखल करणे, मतदार नोंदणी करणे, ॲपद्वारे नोंदणी झालेला क्रमांक दाखवणे गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयाचे आयडी कार्ड सोबत आणणे हे दोन पुरावे दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्याचा अधिकार मिळेल. मतदान हे आपापल्या महाविद्यालयातच मतपत्रिकेद्वारे मतपेटीत गुप्तपणे टाकून करता येणार आहे.

YIN App QR code

"आपल्याला देखील स्वतःच्या महाविद्यालयातून या नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवार म्हणून उभे राहायचे असल्यास आपण खाली दिलेल्या क्यू आर कोड ला स्कॅन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकता."

अधिक माहितीसाठी संपर्क - 9881504492

शंतनू पोंक्षे, पुणे यिन अधिकारी

यिन म्हणजे नेतृत्व तयार करण्याची चळवळ आहे. यिन मध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी भविष्यात लाखो लोकांचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनतात. यिन प्लॅटफॉर्मद्वारे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासोबत अनेक लोकउपयोगी कामे करण्याची संधी प्राप्त होते. आपले कर्तृत्व महाविद्यालय , शहर व राज्यात सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यिन निवडणुकीत सहभागी होऊन जोमाने काम करायला हवं.
रोहित आगळे यिन माजी महसूलमंत्री
सकाळ यिन महाविद्यालय निवडणुकीच्या माध्यमातुन, माझ्या सारख्या एका ग्रामीण भागातील वि्द्यार्थ्यांला पुण्यासारख्या ठिकाणी एका कॉलेजचा अध्यक्ष होऊन त्याठिकाणी नेतृत्व सिद्ध करता आले व अनेक सामाजिक उपक्रम राबवता आले. यिनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी उपयोगी प्रकल्प, उपक्रभरारी द्यावी. यंदा यिन मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री ही एक मुलगी असेल अशी आशा व्यक्त करते.
सुमित पतंगे माजी अध्यक्ष , मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय
विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आपल्यातील नेतृत्व गुण वाढविण्याच्या दृष्टीने 'यिन निवडणूक 2023' मध्ये आवर्जून नाव नोंदणी करावी आणि आपल्या नेतृत्व गुणांना भरारी द्यावी. यंदा यिन मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री ही एक मुलगी असेल अशी आशा व्यक्त करते.
वैष्णवी खताळ, यिन माजी सामाजिक न्यायमंत्री
यिनच्या वतीने दर वर्षी नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण समाजासमोर येण्यास मोठी मदत होते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी विचारविनिमय कारण्यासची संधी यिनच्या माध्यमातून मिळते.
रविना रेणुसे, माजी यिन अध्यक्ष, सरहद महाविद्यालय

हे असतील यिन निवडणूक २०२३ कोअर कमिटी सदस्य - रोहित आगळे, वैष्णवी खताळ, आशुतोष साठे, स्वप्नील पालखे, सुमित पतंगे, रविना रेणुसे, शिवशंकर सुफलकर, दिपक शेगर, किरण भणगे, रचना पाटील, स्वप्नील चौधरी, तीर्थ पुराणिक, अजित लाड, सय्यद जिंदावली, करिष्मा राठोड, चैतन्य सांदनशीव, प्रतीक आरोटे, श्रेया वाघमारे, प्रवीण सोनटक्के, आकांक्षा जैन, आनंद केंद्रे, मानसी घंटे, केतन शिंदे, सोहा जाधव, शुभम गोसावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT