young entrepreneurs 
युथ्स-कॉर्नर

Young Entrepreneurs: तरुण उद्योजकांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे.

हुंग्यो यांनी दिला उद्योजकतेचा मुलमंत्र.

टीम YIN युवा

उद्योजकतेमध्ये संघटीत समूह हीच ताकद असते, ती वाढण्यासाठी संघटन संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. तरुण उद्योजकांनी संशोधनाला प्राधान्य दिले पाहिजे. संशोधनाच्या माध्यमातून उद्योजकतेच्या नाविन्यपूर्ण कल्पना सत्यात उतरवल्या पाहिजे.

तरुणांमधील उद्योजकता विकसित करणे हाच संशोधनाचा मुख्य उद्देश असतो असे मत मणिपूर येथील सामाजिक कार्यकर्ते, RREA चे संचालक माथंमी हुंग्यो यांनी व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाच्या ' यिन' केंद्रीय समितीच्या ऑनलाईन रिसर्च वेबिनार सिरीजमध्ये ते बोलत होते.

हुंग्यो म्हणाले की, उद्योजकांपुढे आव्हाने आहे. संसाधने वाढवणे, कल्पना, व्यावसायिकदृष्टी टिकवून ठेवणे, लोकशाही प्रक्रिया समजून घेणे, देशातील हितसंबंधातील संघर्ष हाताळणे, संघटनात्मक बांधणी करून संघटन संस्कृती निर्माण करणे.

या प्रथम सत्राचे प्रास्ताविक उदयोजक समितीचे प्रज्वल ढाणे यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत व परिचय यिनच्या केंद्रीय सभापती दिव्या भोंसले यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष गणेश दूधे यांनी केले. वेबिनारचे तांत्रिक काम रेवार्थ गोविंदवार यांनी पाहिले. समितीचे अध्यक्ष सुदर्शन सरनाईक यांनी आभार मानले.

द्वितीय सत्रामध्ये,

व्यवसाय महिलांना आत्मरिर्भर बनवतो, यिन वेबीनार : उमंग श्रीधर यांचे प्रतिपादन.

महिला उद्योजक म्हणून काम करताना अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्यातून मार्ग काढायचा आणि समोर चालत राहायचे. आवडीचा व्यवसाय निवडा आणि त्यात झोकून देऊन काम करा. व्यवसायच तुम्हाला ओळख निर्माण करून देतो , आत्मनिर्भर बनवतो.

असे मत मध्यप्रदेश येथील युवा उद्योजक उमंग श्रीधर यांनी व्यक्त केले.सकाळ माध्यम समूहाच्या ' यिन' केंद्रीय उद्योजक समितीच्या ऑनलाईन रिसर्च वेबिनार सिरीजमधील दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या.

उमंग श्रीधर म्हणाल्या की, मी उच्चभ्रु कुटुंबात जन्मलेली आहे. तेव्हा अनेक मुली नोकरीच्या मागे धावायच्या पण मी वेगळी वाट निवडली. नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे बनलो. आज अनेक महिलांच्या हाताला काम देऊ शकले याचा आनंद वाटतो. हाताने बनविण्यात येणाऱ्या वस्तूलाच यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणायचा होता. म्हणून खादीवर संशोधन केले.

तरुण उद्योजकांना स्टार्ट अप सुरू करताना संघटन बांधणी, भांडवल उभारणी योग्य मार्गदर्शनाची गरज अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. असे मत श्रीधर यांनी व्यक्त केले.

उमंग श्रीधर या उमंग श्रीधर डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संस्थापक आहेत. २०१९ मध्ये त्यांच्या कामाची दखल फोर्ब्स सोशल एंटरप्रेन्युअर्स म्हणून घेतली गेली आहे. त्यांनी ग्रामीण भारतातील महिला कारागिरांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले आहे.

या द्वितीय सत्राचे प्रास्ताविक प्रसाद मदन यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती दिव्या भोसले यांनी केले. वेबिनारचे तांत्रिक काम रेवार्थ गोविंदवार यांनी पाहिले. सूत्रसंचालन राजश्री माने यांनी केले. प्रसाद सातपुते यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT