Khed Gets 2 Point 5 Crore Development Works After MP Sunil Tatkare Raises The Issue And Seeks Immediate Action

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

''अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं पाहिजे होतं'', आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

संतोष कानडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे यापूर्वी विलीनीकरणाबाबत अनभिज्ञ असल्याचं सांगत होते आणि स्व. अजित पवार यांच्यासोबत याबाबत बोलणंही झालं नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांची भूमिका आता बदलली असून अजितदादा असते तर विलीनीकरण झालं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

याच मुद्द्यावरुन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, स्व. अजित पवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या 13 बैठका झाल्या मग या बैठकांमध्ये अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून सुनील तटकरे का नव्हते? असा थेट सवाल थोरवेंनी केला.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाबाबत स्व. अजितदादा पवार यांनी मला पूर्ण कल्पना दिली होती, हे सुनील तटकरे खोटं बोलत आहेत. अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर तटकरे चकार शब्द काढत नाहीत, विलीनीकरणाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, असं सांगणाऱ्या तटकरेंनी आता यू टर्न घेतला आहे.

''तटकरे हा खोटा आणि कपटी माणूस आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर तटकरे सर्व आमदारांना फोन करत होते जेणेकरून सर्व आमदार आपल्या बाजूला येतील कारण त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखातं हवं होतं.. परंतु सुनेत्रा पवारांच्या खेळीने त्यांचा डाव उलटला.'' असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सरकारला न्यायालयाचा दणका, खासगी प्रकल्पासाठी 'टाटा'च्या जमीन संपादनाचा निर्णय रद्द

कर्नाटकात पेट्रोलमध्ये इथेनॉलची वाढीव मात्रा? सात जिल्ह्यांतील नमुन्यांमध्ये 31.2% पर्यंत प्रमाण; केंद्राकडे कारवाईची मागणी

PM Kisan 25th Installment Date 2027 : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसान योजनेचा 25 वा हप्ता कधी मिळणार? 'या' महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update: भाजप आमदार देवेंद्र कोठेंविरोधात सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

IND vs NZ 2nd ODI Live : न्यूझीलंडने LIVE मॅचमध्ये टीम बदलली, फलंदाजीला दुसरा खेळाडू अन् आता गोलंदाजीला Matt Fisherला उतरवले, त्याने विकेट घेतली; नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT