दुसऱ्या लाटेत 1 कोटी भारतीयांनी नोकरी गमावली- रिपोर्ट

job
job
Summary

गेल्या दीड महिन्यापासून कोरोना महामारी जगासह देशभरात थैमान घालत आहे. विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागला

नवी दिल्ली- गेल्या दीड महिन्यापासून कोरोना महामारी जगासह देशभरात थैमान घालत आहे. विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सर्व आर्थिक उपक्रमांना खिळ बसली. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा संथ गतीने पुढे मार्गक्रमन करत आहेत. या काळात उद्योगधंदे बंद ठेवण्यात आल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समजत नाही. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये (second wave of Covid-19) जवळपास 1 कोटी भारतीयांनी आपली नोकरी गमावली असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. (1 crore Indians have lost their jobs because of the second wave of Covid-19)

2020 वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना महामारीला सुरुवात झाली, त्यानंतर मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. जूलै महिन्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. पण, यादरम्यानच्या काळात अनेकांना रोजगार गमवावा लागला. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा होती. निर्बंधही शिथील करण्यात आले होते. पण, देशात कोरोनाची दुसरी लाट आली. ही दुसरी लाट भारतीयांसाठी अधिक वाईट ठरली. याकाळात हजारोंच्या संख्येने मृत्यू नोंदले गेले. एवढेच नाही, तर अनेकाना बेरोजगार व्हावं लागलं आहे. सीएमआयई Centre for Monitoring Indian Economy (CMIE) चे संचालक महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांना आपली नोकरी गमवावी लागली, तर 97 टक्के कुटुंबियांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे.

job
दिलासा मिळतोय..ॲक्टिव रुग्णांची संख्या आली १० हजारांच्या खाली

व्याय यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, मे महिन्यात बेरोजगारीचा दर 8 टक्के होतो, तो मे महिन्यामध्ये 12 टक्के झाला आहे. बेरोजगारीमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण कोरोनाची दुसरी लाट आहे. अर्थव्यवस्था पुन्हा सुरु झाली, तर ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण, पूर्णपणे आपण ती सोडवू शकत नाही. ज्यांनी आपला जॉब गमावला आहे, त्यांना दुसरा जॉब मिळण्यास अडचण येत आहे. विशेष करुन अनौपचारिक क्षेत्रातील रोजगारामध्ये घट झाली आहे.

job
जगासमोर बोलण्याची भीती; नाओमीची फ्रेंच ओपनमधून माघार

मे महिन्यामध्ये बरोजगारीच्या दराने 23.3 टक्क्यांचा उच्चांक गाठला होता. याकाळात देश पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये होता. बेरोजगारीचा दर 3 ते 4 टक्क्यांच्या दरम्यान असणं साधारण मानलं जातं. त्यामुळे सध्याचा बेरोजगारीचा दर घटला तरच अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल. त्यासाठी केंद्र सरकारला बाजारात रोजगार निर्माण करावे लागतील. 3 टक्के लोकांच्या उत्पनामध्ये वाढ झाली आहे, तर 55 टक्के लोकांच्या उत्पन्नामध्ये घट झाली असल्याचं व्यास यांनी सांगितलं. कामगार सहभाग दर ( labour participation rate) किंवा काम करणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी कोरोनापूर्व काळातील 42.5 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांवर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com