Haldiram : बीकाजी फूड्सनंतर आता हल्दीरामही आणणार IPO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haldiram

Haldiram : बीकाजी फूड्सनंतर आता हल्दीरामही आणणार IPO

बिकाजी फूड्सने शेअर बाजारात चांगली सुरुवात केल्यानंतर, आता त्यांचा प्रतिस्पर्धी हल्दीराम (Haldiram)  पुढील 18 महिन्यांत आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून ही माहिती आम्हाला मिळाली आहे.

आयपीओपूर्वी हल्दीराम कुटुंबाचा नागपूर आणि दिल्लीतील व्यवसायांचे विलीनीकरण करून संयुक्त कंपनी स्थापन करण्याचा विचार आहे. विलीनीकरण प्रक्रियेवर चर्चा सुरु आहे आणि येत्या एका वर्षात हे विलिनीकरण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.(after Bikaji Haldiram ipo coming soon in share market)

हेही वाचा: Sula Vineyards IPO : सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ लवकरच, सेबीची मंजूरी

दोन्ही पक्षांनी विलीनीकरणासाठी बँकर्सशीही संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. बिकाजी आणि हल्दीराम व्यवसायाची सुरुवात एकाच कुटुंबातून झाली आहे. चार सख्खे भाऊ या दोन्ही कंपन्यांचे मालक आहेत.

चार भावांचे आजोबा गंगा बिशन अग्रवाल यांनी 1982 मध्ये मूळ हल्दीरामची स्नॅक्स कंपनी सुरू केली. मोठा भाऊ शिव किशन अग्रवाल नागपूर-मुख्यालय असलेले हल्दीरामचे स्नॅक्स चालवतात. हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल हा दिल्लीतील व्यवसाय मनोहर आणि मधुसूदन अग्रवाल हे दोन भाऊ संयुक्तपणे चालवतात.

चौथा भाऊ, शिव रतन अग्रवाल, बिकाजी फूड्स इंटरनॅशनल चालवतात, ज्यांच्या आयपीओला नुकताच गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बिकाजीचा आयपीओ 7 नोव्हेंबरला बंद झाला आणि गुंतवणूकदारांकडून 26.67 पटीने ओव्हरसबस्क्राइब झाला.

हेही वाचा: Inox Green IPO: आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेजचा आयपीओ आजपासून खुला...

हल्दीरामच्या संभाव्य आयपीओवर बाजाराचे बारकाईने लक्ष असेल. हल्दीरामने केलेल्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, दोन्ही हल्दीराम कंपन्यांचा एकत्रित महसूल FY22 मध्ये 9,000 कोटी रुपये होता. याच आर्थिक वर्षात बिकाजी फूड्सच्या 1,600 कोटींच्या कमाईपेक्षा हे अनेक पटींनी जास्त आहे.


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.