अ‍ॅमेझॉनचा 'मेगा सॅलरी डेज' सेल, महागड्या ब्रँड्सवर तब्बल 40 टक्के डिस्काऊंट

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 30 December 2020

अ‍ॅमेझॉन डॉट इनवर मेगा सॅलरी डेजदरम्यान ग्राहक सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, आयएफबी, गोदरेजसह अनेक ब्रँड्सच्या महागड्या प्रॉडक्टवर मोठी बचत करता येईल.

नवी दिल्ली- कोरोनाने ग्रासलेले 2020 वर्ष विसरुन नवे वर्ष 2021 चे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने एक नवा प्लॅन तयार केला आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अ‍ॅमेझॉन डॉट इनने (Amazon.in) मंगळवारी मेगा सॅलरी डेज सेलची (Mega Salary Days) घोषणा केली आहे. या अंतर्गत टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्पोर्ट्स, ऑटो प्रॉडक्ट्स, खेळण्याचे साहित्य आदींसह अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जाणार आहे. अ‍ॅमेझॉनवर ग्राहक 1 जानेवारी ते 3 जानेवारीदरम्यान आकर्षक किंमतीत आपले आवडते ब्रँड आणि उत्पादने निवडू शकतील. 

डिस्काऊंटची लयलूट

हेही वाचा- 2021 पासून भारतात धावणार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या इलेक्ट्रिक कारविषयी​

या सेलमध्ये मोठ्या उपकरणांवर 40 टक्के, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीन्सवर 35 टक्के आणि एअर कंडिशनर्सवरही 35 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिली जाणार आहे. त्याचबरोबर मायक्रोवेव्ह ओव्हनवरही 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर टीव्ही सेटवरही 30 टक्क्यांची डिस्काऊंट मिळणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के म्हणजेच 1250 रुपयांपर्यंत त्वरीत डिस्काऊंट मिळेल आणि ईएमआयवर प्रॉडक्ट घेणाऱ्यांना 1500 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. 

हेही वाचा- नवीन वर्षात घरगुती उपकरणे महागणार

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅमेझॉन डॉट इनवर मेगा सॅलरी डेजदरम्यान ग्राहक सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, आयएफबी, गोदरेजसह अनेक ब्रँड्सच्या महागड्या प्रॉडक्टवर मोठी बचत करता येईल. होमटाऊन, कॉयरफिट, स्लिपवेलशिवाय बोट, सोनी, जेबीएलवर भक्कम डिस्काऊंट दिले जाणार आहे. 

हेही वाचा- भाजप अजूनही आशावादी; रजनीकांत NDA ला साथ देतील असा विश्वास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amazon announces mega salary days sale big brands discount up to 40 percent