महागाई वाढणार? RBI करणार आज रेपो दरात वाढ

यावर्षी महागाईची टक्केवारी दर वाढवण्याची सुद्धा शक्यता बाजार विश्लेषक आणि अर्थशास्त्रज्ञांनांकडून वर्तवली जात आहे.
RBI
RBI esakal

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आज पॉलिसी रेपो दर जवळपास पाच टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी महागाईची टक्केवारी दर वाढवण्याची सुद्धा शक्यता बाजार विश्लेषक आणि अर्थशास्त्रज्ञांनांकडून वर्तवली जात आहे.

बाजारातील अस्थिरता RBI पॉलिसीआधी गुंतवणूकदारांना बाजारापासून दूर राहण्यास भाग पाडत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजाराने रेपो दर आणि CRR मध्ये 40-50 बेसिस पॉइंट्स वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, लिक्विडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलल्यास त्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल, हे तेवढेच खरं आहे. (RBI is likely to hike the policy repo rate by 40 basis points to 4.80 per cent on Wednesday)

RBI
Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव

RBI ची सहा सदस्यांची चलनविषयक धोरण समितीकडून हा व्याजदर वाढवणार असल्याचे बोललं जात आहे कारण महागाई गेल्या अनेक महिन्यांपासून मध्यवर्ती बँकेच्या सहनशीलतेच्या मर्यादेच्या वर राहिली आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, आरबीआय गव्हर्नर दास म्हणाले की, जूनमध्ये दर वाढीची अपेक्षा सांगू शकत नाही.

RBI
सलग तीन दिवसापासून शेअर बाजारात घसरण

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की रेपो दरवाढ निश्चित असली तरी, किती दरवाढ होईल हा प्रश्न कायम असणार. जूनमध्ये पार पडणाऱ्या धोरण बैठकीत आरबीआयने 40 bps ने रेपो दर वाढवण्याची अपेक्षा केली आहे

गेल्या महिन्यात, आरबीआयने पॉलिसी रेपो दर 4.4 टक्क्यांनी वाढवला होता. सुमारे दोन वर्षांतील पॉलिसी रेपो दरातील ही पहिलीच वाढ होती. रेपो दर हा एक प्रकारचा व्याजदर आहे ज्यावर RBI बँकला अल्पकालीन निधी देते.

RBI
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

या वर्षाच्या सुरुवातीपासून महागाई दर आरबीआयच्या 2-6 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.नवीनतम उपलब्ध आकडेवारीनुसार, महागाई एप्रिलमध्ये 7.79 टक्क्यांच्या आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जानेवारी 2022 पासून महागाई 6 टक्क्यांच्या वर आली आहे.

आरबीआय पुढील आठवड्यातही रेपो दरात आणखी 0.40 टक्क्यांनी वाढ करू शकते. याशिवाय, ऑगस्टच्या बैठकीतही रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असे न झाल्यास आरबीआय पुढील आठवड्यात 0.50 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com