'या' मेटल स्टॉकमध्ये 600 रुपयांपेक्षा जास्त घसरण, गुंतवणुकदारांनी काय करावे?

शेअर्समध्ये ऑक्टोबर 2020 पासून बरीच वाढ दिसून आली.
Share Market Updates | Stock Market News
Share Market Updates | Stock Market Newssakal

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशात अनेक शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. असंच काहीसे टाटा स्टीलच्या (Tata Steel) बाबतीत घडत आहे. (this metal stock falling with more than 600 rs. what should investors do)

टाटा स्टीलच्या (Tata Steel) शेअर्समध्ये ऑक्टोबर 2020 पासून बरीच वाढ दिसून आली. त्यावेळी टाटा स्टील 400 रुपयांच्या जवळ व्यवहार करत असताना, ऑगस्ट 2021 मध्ये स्टॉकने 1500 रुपयांचा टप्पा ओलांडला. पण, आता हा स्टॉक 600 पर्यंत घसरला आहे आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

Share Market Updates | Stock Market News
Crypto currency : कूटचलनांची किंमत वधारली; बाजारात उत्साहाचे वातावरण

एनएसईवर टाटा स्टीलच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च किंमत (52 week high) 1534.50 आहे. त्याच वेळी, आता हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमतीवर व्यवहार करत आहे. टाटा स्टीलची 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 895.50 रुपये आहे. गेल्या आठवड्यात टाटा स्टील 907 रुपयांवर होता.

Share Market Updates | Stock Market News
महत्त्वाची बातमी! ब्रोकरेज हाऊसनं LIC चे शेअर्स खरेदी करण्याचा दिला सल्ला

टारगेटमध्ये घट
बाजारातील अस्थिरता पाहता टाटा स्टीलच्या शेअरबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. टाटा स्टीलचे शेअर्स आणखी खाली येतील का ? आता या किंमतीत शेअर्स विकून टाकावे का असे अनेक प्रश्न गुंतवणुकदारांच्या मनात आहेत. दुसरीकडे, ICICI सिक्युरिटीजने टाटा स्टीलचे टारगेट कमी केले आहे. त्यांनी हे टारगेट 827 रुपये केले आहे.

मंदीचे संकेत
RSI खालच्या दिशेने असल्याचे कॅपिटल व्हाया ग्लोबल रिसर्चचे अखिलेश जाट म्हणाले. जे किमतींमध्ये आणखी मंदी दाखवत आहे. 950 रुपयांचा सपोर्ट तुटला असून त्यानंतर त्यात आणखी घसरण पाहायला मिळू शकते. टाटा स्टीलची किंमत त्याच्या सपोर्टींग लेव्हल आणि सर्व-महत्त्वाच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली टिकून आहे असेही जाट म्हणाले.

Share Market Updates | Stock Market News
22 लाख कोटी बुडाले; बिटकॉइन 20,000 डॉलरच्या खाली

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com