Stock : बँकिंग स्टॉक येत्या काळात देईल 56% नफा, आता गुंतवणूकीची चांगली संधी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stock

Stock : बँकिंग स्टॉक येत्या काळात देईल 56% नफा, आता गुंतवणूकीची चांगली संधी...

गेल्या काही दिवसांपासून बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा कल दिसून येत आहे. खासगी क्षेत्रातील बंधन बँकचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी घसरले आहेत. तरिही, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत बाय रेटिंग कायम ठेवले आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने बंधन बँकेसाठी 408 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा ते 56 टक्के अपसाइड आहे. बीएसईवर नुकतेच बंधन बँकेचे शेअर्स 261.50 रुपयांवर बंद झाले आहेत.

एप्रिल-जून 2022 ची पहिली तिमाही बंधन बँकेसाठी चांगली नव्हती आणि तिचा नेट प्रॉफिट तिमाही आधारावर 190 कोटी रुपयांवरून 89 कोटी रुपयांवर घसरला आहे. पण, महसूल 387 कोटी रुपयांवरून 406 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. आता जुलै-सप्टेंबर 2022 च्या तिमाहीबद्दल बोलायचे झाल्यास, आसाममधील पूर आणि रिस्ट्रक्चर्ड पूलमधून फॉरवर्ड फ्लोमुळे ग्रॉस एनपीए आणि एसएमए-2 चे आकडे चांगले नसतील असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

त्याचवेळी, मॉर्गेज लेंडिंग ग्रोथसाठी सकारात्मक वातावरण आहे. याशिवाय फ्रँचायझी इंव्हेस्टमेंट सुरू राहणे अपेक्षित आहे. या सर्व कारणांमुळे, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने त्याचे टारगेट 414 रुपयांवरून 408 रुपयांपर्यंत कमी केली आहे पण बाय रेटिंग कायम ठेवले आहे.

हेही वाचा: Share Market : फोर्ब्स अँड कंपनीच्या स्टॉकचा 6 महिन्यांत 88 टक्के परतावा

बंधन बँकेचे शेअर्स 17 मे 2022 रोजी 349.50 रुपयांच्या एका वर्षातील विक्रमी उच्चांकावर होते. पण त्यानंतर विक्रीचा ट्रेंड सुरू झाला आणि सध्या त्याची किंमत सुमारे 25 टक्के डिस्काउंटवर मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, सध्या बंधन बँकेत गुंतवणूक केल्यास 56 टक्के परतावा मिळू शकतो.

हेही वाचा: Share Market: आठवड्याभराच्या घसरणीला ब्रेक, Sensexमध्ये 1045 अंकाची उसळी

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :BankingStockInvestment