'भारत हेवी इलेक्ट्रिकल्स'ला १,५३२ कोटींचा तोटा

पीटीआय
Saturday, 13 June 2020

इंजिनियरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.ला (बीएचईएल) मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत १,५३२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीला ६७६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. बीएचईएल ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

इंजिनियरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.ला (बीएचईएल) मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत १,५३२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीला ६७६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. बीएचईएल ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.चे एकूण उत्पन्न घटून ५,१९८ कोटी रुपयांवर आले आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीला १०,४९२ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले होते. तर चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च ९,२१७ कोटी रुपयांवरून घटून ५,९०६ कोटी रुपयांवर आला आहे.

आर्थिक स्थैर्यासाठी लक्षात घ्या या '७' टिप्स

मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत कॅपिटल गुड्स कंपन्यांना कोविड-१९ महामारीमुळे देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठाच फटका बसला आहे. 
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. चे उत्पादन प्रकल्प आणि सेवा प्रकल्प २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंद होते. याचा विपरित परिणाम कंपनीच्या महसूलावर झाला आहे.

अनिल अंबानींकडून १,२०० कोटींच्या वसूलीसाठी स्टेट बॅंकेची एनसीएलटीकडे धाव 

२०१९-२० या आर्थिक वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.च्या महसूलाला ४,००० कोटी रुपयांचा फटका बसला आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. कंपनी आपली मालमत्ता, गुंतवणूक, व्यापार, कंत्राट आणि इतर साधनांद्वारे हे  नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करते आहे. कोविड-१९ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.च्या संचालक मंडळाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश जाहीर केलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BHEL reports loss of 1532 crors in Q4 of FY20