बिल गेट्स यांचा क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, का? जाणून घेऊयात...

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) विश्वास नाही.
बिल गेट्स यांचा क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, का? जाणून घेऊयात...

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) विश्वास नाही. एकदा नाही तर अनेकदा त्यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत संशय घेतल् आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, Reddit वर 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये त्यांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक का करत नाही याबद्दल खुलासा केला.

वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत गेट्सने क्रिप्टोकरन्सीवरही टीका केली होती. सध्या ज्या प्रकारे क्रिप्टोकरन्सी कार्य करते, ती काही गुन्हेगारी कामांसाठी वापरली जाऊ शकते,असे गेट्स यांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यापासून दूर राहणे फायदेशीर आहे असेही ते म्हणाले.

बिल गेट्स यांचा क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, का? जाणून घेऊयात...
म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...

बिटकॉइन वर किंवा खाली जाऊ शकतो. पुढे बिटकॉईनचे कसे होईल हे सांगण्याचा कोणताही मार्ग नाही असे CNBC ला दिलेल्या मुलाखतीत गेट्स म्हणाले. इलॉन मस्कसारख्या लोकांच्या ट्विटचा परिणाम क्रिप्टोकरन्सीच्या किमतींवर होतो. एलोन मस्ककडे खूप पैसा आहे. तो खूप हुशार आहे. त्यांचे बिटकॉइन अचानक वाढू शकते किंवा पडू शकते याची आपल्याला चिंता नसल्याचेही गेट्स म्हणाले.
क्रिप्टोमध्ये इटेरेस्ट दाखवणारे लोक नियमित बचतीसाठी पैसे बाजूला ठेवत नाहीत. जर तुमच्याकडे एलॉन मस्कपेक्षा कमी पैसे असतील तर मात्र तुम्ही त्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला गेट्स यांनी दिला .

बिल गेट्स यांचा क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, का? जाणून घेऊयात...
या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक

क्रिप्टोकरन्सीसह जवळपास सर्व एसेट क्लासने गेल्या तीन-चार महिन्यांत मोठे नुकसान पाहिले आहे. युक्रेन संकट, वाढती महागाई, व्याजदरात झालेली वाढ ही यामागची कारणे असू शकतात. सुरुवातीला, बिटकॉइन ही इनफ्लेशनपासून संरक्षण करण्यासाठीचे ऍसेट मानले जात होते. पण, त्यात घट झाल्याने हा समज तुटला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com