BMC Budget 2023 : इक्बाल सिंह चहल यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला.
BMC Budget 2023
BMC Budget 2023Sakal

BMC Budget 2023 Updates :  मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात मांडण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यंदा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला गेला.

सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प डॉ इक्बाल सिंह चहल यांना सादर केला. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला.

देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासकाने अंदाजपत्रक मांडला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या बजेट मधील प्रमुख मुद्दे :

आरोग्य विभाग :

  • आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च ₹6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे.

  • भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास ₹110 कोटी

  • गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम ₹110 कोटी

  • एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹95 कोटी

  • कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकाम ₹75 कोटी

  • सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास ₹70 कोटी

  • एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय ₹60 कोटी

  • वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹53.60 कोटी

  • एल विभागातील संघर्ष नगर येथे, रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या भूखंड क्र. 11A/4 चा विकास ₹35 कोटी

  • ऍक्वर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम ₹28 कोटी

  • नायर दंत महाविद्यालयाचे विस्तारीकरण ₹17.50 कोटी

  • ई विभाग, कामाठीपुरा येथील सिद्धार्थ / मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास ₹12 कोटी

  • ओशिवरा प्रसूतीगृहाची ₹9.50 कोटी दुरुस्ती/ पुनर्बांधकाम

  • के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नती ₹7 कोटी

  • आर. एन. कूपर रुग्णालय महाविद्यालयाचे बांधकाम ₹5 कोटी येथे वैद्यकीय

  • टाटा कंपाऊंड आणि हाजी अली वसतीगृहाचे बांधकाम ₹2 कोटी

  • के. ई. एम. रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाकरीता तरतूद ₹1 कोटी

मलनिःसारण प्रकल्प :

मुंबई मलनिःसारण प्रकल्प (एमएसडीपी) ₹3566.78 कोटी

  • पाणी पुरवठा प्रकल्प ₹1376 कोटी

  • जल अभियंता ₹780 कोटी

  • जलवहन बोगद्यांची बांधकामे ₹433 कोटी

  • मलनिःसारण प्रचालन ₹364 कोटी

  • 2000 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नविन जलशुध्दीकरण प्रकल्प ₹350 कोटी

  • मुंबई मलनिःसारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) ₹300 कोटी

  • 200 द.ल.लि. प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्पाची मनोरी येथे उभारणी ₹200 कोटी

  • कुलाबा येथे 'आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रीया केंद्र' ₹32 कोटी

BMC Budget 2023
रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सर्वसाधारण तरतूद :

  • सागरी किनारा रस्ता प्रकल्प ₹3545 कोटी

  • प्राथमिक शिक्षणाकरीता तरतूद ₹3347.13 कोटी

  • रस्त्यांच्या सुधारणेकरीता तरतूद ₹2825.06 कोटी

  • पूलांकरिता एकूण तरतूद ₹2100 कोटी (रेल्वे रुळांवरील आणि रुळांखालील महानगरपालिका हद्दीतील पूलांचे MRIDCL द्वारे निष्कासन आणि पुनर्बांधणी ₹400 कोटी या कामासह)

  • पर्जन्य जलवाहिन्यांकरिता तरतूद ₹2570.65 कोटी (बृहन्मुंबईमध्ये मिठी नदी आणि इतर नदी/नाले रुंदीकरण/वळविण्याचे काम ₹654.44 कोटी,

  • नद्यांच्या पुनर्जिवनाकरीता तरतूद ₹582.31 कोटी,

  • घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ₹366.50 कोटी

  • आश्रय योजनेकरीता तरतूद ₹1125 कोटी

  • गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (GMLR) ₹1060 कोटी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या आधुनिकीकरण आणि दर्जोन्नतीकरीता तरतूद ₹133.93 कोटी देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाकरीता तरतूद ₹13.69 कोटी

शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प :

  • खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद

  • व्हरच्युल क्लासरूमसाठी 3. 20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • महापालिका शाळांतील प्रशिक्षणे आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे

  • 2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद

  • याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे

  • आर्थिक वर्ष 2023 - 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत

  • नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28 . 45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

  • निवडक शाळांतील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

  • मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे

  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

BMC Budget 2023
BMC Budget : मुंबई आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कशी?

इतर महत्वाचे मुद्दे :

  • मुंबईतील पुढील अडीच ते तीन वर्षात संपूर्ण मुंबईचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण केले जाईल, यासाठी सुद्धा भरीव तरतूद करण्यात आली आहे

  • आरोग्य, शिक्षण, पर्यावरण , पारदर्शकता हे चार स्तंभ या वेळेसच्या बजेटचे आहे

  • आगामी पालिका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे

  • कोरोना काळात मागील 2 वर्ष मालमत्ता करात सूट देण्यात आली होती, यंदा तो निर्णय तसाच ठेवण्यात आला आहे

  • मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com