LICची जीवन प्रगती पॉलिसी, सविस्तर जाणून घेऊयात…

एलआयसीच्या एका चांगल्या पॉलिसीबद्दल जाणून घ्या
LIC
LICसकाळ

एलआयसीच्या अनेक पॉलिसी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. स्वतःच्या भविष्याचा विचार करुन अनेक जण ही पॉलिसी घेतात. अशातच एलआयसीकडे सर्वाधिक पॉलिसीधारक आहेत. त्यामुळेच लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन कंपनी वेळोवेळी नवनवीन पॉलिसी आणत असते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या आणखी एका चांगल्या पॉलिसीबद्दल सांगणार आहोत. (check here LIC Policy)

LIC
Gold-Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

जीवन प्रगती पॉलिसी

एलआयसी जीवन प्रगती ही एलआयसीची अशीच एक पॉलिसी आहे, जी तुम्हाला चांगला परतावा देते. या पॉलिसी अंतर्गत विमाधारकांना विमा संरक्षणही मिळते. याशिवाय, भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास, त्याच्या/तिच्या नॉमिनीला विम्याचा पूर्ण लाभ मिळतो.

वयोमर्यादा काय ?

जीवन प्रगती पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर (Maturity) तुम्हाला 28 लाख रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला यात 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूकदारांना या पॉलिसीमध्ये दर महिन्याला 6 हजार रुपये म्हणजेच दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील. ही पॉलिसी 12 वर्षापासून सुरू केली जाऊ शकते, ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

LIC
नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घेऊयात अधिक…

डेथ बेनिफिट

LIC च्या जीवन प्रगती पॉलिसीत नियमित प्रीमियम भरल्यावर, तुम्हाला डेथ बेनिफिटही (Death Benefit) मिळतो, जो दर 5 वर्षांनी वाढतो. ही रक्कम तुमची पॉलिसी किती वर्षे सुरु आहे यावर अवलंबून असते.

सुविधा

पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून 5 वर्षांपर्यंत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर 100% बेसिक सम अॅश्युअर्ड (Basic Sum Assured) दिले जाते. अपघात विमा (Accident Insurance) आणि अपंगत्व रायडर्स (Disability Riders) या योजनेत समाविष्ट करू शकतात, ज्यासाठी थोडे अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com