esakal | Dream 11 भारतीय तरीही आहे चीनशी कनेक्शन? प्रश्नावर BCCI ने दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

dream 11 ipl

चिनी मोबाइल कंपनी VIVO सोबतचा करार रद्द केल्यानंतर आयपीएलला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. नवीन स्पॉन्सरशिप फॅन्टसी गेमिंग फर्म असेलेल्या Dream 11 ला मिळाली आहे.

Dream 11 भारतीय तरीही आहे चीनशी कनेक्शन? प्रश्नावर BCCI ने दिलं उत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - चिनी मोबाइल कंपनी VIVO सोबतचा करार रद्द केल्यानंतर आयपीएलला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. नवीन स्पॉन्सरशिप फॅन्टसी गेमिंग फर्म असेलेल्या Dream 11 ला मिळाली आहे. आयपीएल 2020 साठी कंपनी 222 कोटी रुपये मोजणार आहे. हा करार 18 ऑगस्ट पासून 31 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी असणार आहे. म्हणजेच एका दिवसासाठी कंपनी जवळपास 1.65 कोटी रुपये देणार आहे. 

VIVO सोबतचा करार रद्द झाल्याने स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत सुरुवातीला पतंजलि, टाटा सन्स यांची नावे होती. टाटा सन्सने शेवटच्या टप्प्यात बोली लावली नाही. तेव्हा बायजू आणि अनअॅकडमी या कंपन्या Dream 11 सोबत शर्यतीत होत्या. बायजूने 210 कोटी रुपयांची तर अनअकॅडमीने 170 कोटी रुपयांची बोली लावली होती. यावेळी Dream 11 ने दोन्ही कंपन्यांना मागे टाकत 222 कोटींची बोली लावून स्पॉन्सरशिप जिंकली. 

हे वाचा - टाटाला मागे टाकणारी Dream 11 कंपनी आहे तरी काय?

दरम्यान, आता अशी चर्चा रंगली आहे की Dream 11 कंपनीमध्ये चीनच्या कंपनीची गुंतवणूक आहे. चीनची टेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या टॅन्सेटने 2018 मध्ये Dream 11 मध्ये 10 कोटी डॉलर म्हणजेच 720 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. बीसीसीआयने Dream 11 मध्ये चीन गुंतवणूकीच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. बीसीसीआयने म्हटलं की, Dream 11 ही भारतीय कंपनी असून इथं काम करणारे 400 हून अधिक कर्मचारी भारतातले आहेत. टॅन्सेंटकडे केवळ 10 टक्के शेअर्स आहेत. Dream 11 फक्त भारतीय युजर्ससाठी आहे. 

हे वाचा - IPL 2020 चे टायटल स्पॉन्सर आता Dream 11; टाटा, बायजूला मागे टाकून मारली बाजी

बीसीसीआयच्या बोर्डाने स्पॉन्सरशिपला भारतीय कंपन्या पुढे याव्यात यासाठी 90 कोटी रुपये रक्कम कमी केली होती. आधी हीच रक्कम 440 कोटी रुपये वर्षासाठी होती. बोर्डाने नव्या बोलीसाठी रक्कम 440 कोटी रुपयांवरून 300 ते 350 कोटी रुपये केली होती. मात्र Dream 11 ला ही स्पॉन्सरशिप फक्त 222 कोटी रुपयांमध्येच मिळाली.