'आत्मनिर्भर भारता'साठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने केल्या 'या' पाच महत्त्वाच्या घोषणा!

FM-Nirmala-Sitharaman
FM-Nirmala-Sitharaman

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१२) 'आत्मनिर्भर भारत' उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. 

याचीच एक झलक आज पाहायला मिळाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारतर्फे एक स्पेशल पॅकेजच घोषित केलं. पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यानंतर या पॅकेजमध्ये नक्की काय असणार आहे, याचा खुलासा आज अर्थमंत्री सीतारामन यांनी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे सुमारे २० लाख कोटींचं आहे. हे पॅकेज देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के असल्याचे कालच पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते. 

अर्थमंत्री सीतारामन यांनी आज जाहीर केलेल्या बूस्टर पॅकेजमध्ये महत्त्वाच्या ५ महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - 

लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळ
लॉकडाउनचा सगळ्यांत मोठा फटका बसलेल्या लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सगळ्यांत मोठा बुस्टर दिला आहे. या क्षेत्रासाठी तीन लाख कोटी रूपयांचे कर्ज देण्यात येणार असून, पुढील चार वर्षांसाठी विनातारण कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. 

विदेशी कंपन्यांचा पत्ता कट 
सरकारी टेंडर प्रक्रियेतील विदेशी कंपन्याची स्पर्धा आता संपुष्टात येणार आहे. 200 कोटी रुपयांची टेंडर आता भारतीय कंपन्यांनाचा मिळणार आहे. या स्पर्धेत विदेशी कंपन्यांना बाहेर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळं भारतीय उद्योग जगताचा मोठा फायदा होणार आहे. 

टीडीएसमध्ये 25 टक्के कपात
टीडीएलच्या दरात 25 टक्क्यांनी कपात करण्यात आलीय. याचा सामान्य जनतेला जवळपास 50 हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. यापूर्वी टीडीएस 10 टक्के होता तो आता 7.5 टक्क्यांवर आलाय. 

रिटर्न भरण्यास मुदतवाढ
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आर्थिक वर्षाचा इन्मक टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ दिलीय. यापूर्वी 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. त्याला आता आणखी मुदतवाढ देण्यात आली असून, ती 30 नोव्हेंबर 2020पर्यंत वाढवण्यात आलीय. 

ईपीएफ सरकार देणार
देशातील 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा ईपीएफ सरकार देणार आहे. देशातील 75 लाख कर्चमाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.

कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी हे २० लाख कोटींच पॅकेज मदत करेल, असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com