हे आहेत भारतातील सर्वांत महाग शेअर्स; जाणून घ्या काय आहेत किंमती 

हे आहेत भारतातील सर्वांत महाग शेअर्स; जाणून घ्या काय आहेत किंमती 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात स्वस्त आणि महाग दोन्ही प्रकारच्या शेअर्सचं ट्रेडिंग होतं. अगदी १ रुपयापासून शेअर्सच्या किमती सुरु होतात. तर अनेक असे शेअर्स आहेत ज्यांच्या किमती १० हजाराच्याही वर आहेत. जास्त किमतीच्या शेअर्समध्ये सर्वचजण ट्रेडिंग करू शकत नाहीत. मात्र एखाद्या कंपनीचा प्रति शेअरचा भाव जास्त असेल, म्हणजे त्या कंपनीचं तिच्या इतर स्पर्धकांसोबत केलेलं मूल्यांकन जास्त, असं होत नाही.

या लेखाच्या माध्यमातून आपण अशा कंपन्यांची नावे जाणून घेणार आहोत ज्या देशातील सर्वात महाग शेअर्स असणाऱ्या ५ कंपन्या आहेत. यामध्ये MRF, श्री सिमेंट, पेज इंडस्ट्री, हनीवेल ऑटोमेशन आणि 3M इंडिया लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

हे आहेत भारतातील सर्वांत महाग शेअर्स; जाणून घ्या काय आहेत किंमती 
बँक अकाउंट इनॲक्टिव्ह झालंय? असे करा पुन्हा सुरु

Expensive Stocks: हे आहेत देशातील सर्वात महाग ५ शेअर्स; सध्या किती आहे यांच्या एक शेअरची किंमत

MRF : ही एक तयार बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचा शेअर देशातील सर्वात महाग शेअर आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत ८२ हजार ९०५ रुपये इतकी आहे. १९९३ मध्ये ही कंपनी शेअर बाजारावर लिस्ट झाली. लिस्टिंगच्या वेळी एका शेअरची किंमत केवळ ११ रुपये होती. म्हणजे तेंव्हा तुम्ही फक्त ११ रुपयांचा एक शेअर जरी विकत घेतला असता तरी त्याची किंमत आता ८२ हजार ९०५ रुपये इतकी झाली असती.

हे आहेत भारतातील सर्वांत महाग शेअर्स; जाणून घ्या काय आहेत किंमती 
तुमचा पगार आहे अनियमित पण बचत करायचीय? असे करा नियोजन

हनीवेल ऑटोमेशन : हनीवेल ऑटोमेशन या कंपनीच्या एका शेअरची किंमत तब्बल ४० हजार ७५० रुपये आहे. ही कंपनी इंग्रिडियन्ट ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स देते.

पेज इंडस्ट्रीज : पेज इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत ३० हजार १३७ रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स देशातील तिसरे सर्वात महाग शेअर्स म्हणून ओळखले जातात. पेज इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील अंतर्वस्त्रे बनवणारी नामांकित कंपनी आहे. ही कंपनी मोजे देखील बनवते.

श्री सिमेंट : श्री सिमेंट या कंपनीच्या एका शेअरची किंमत २८ हजार ४७५ रुपये इतकी आहे. ही उत्तर भारतातील सिमेंट बनवणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचं एकूण भांडवल तब्बल 1.02 लाख करोड रुपये इतकी आहे.

3M इंडिया लिमिटेड : 3M इंडिया लिमिटेड या कंपनीच्या एका शेअरची किंमत २५ हजार ७४५ रुपये इतकी आहे. ही कंपनी हेल्थ केअर तसेच सफाईचा क्षेत्रात विविध प्रोजेक्ट राबवत असते. या कंपनीचं एकूण भांडवल साधारणतः २९ हजार १६० कोटींचं आहे.

वरील सर्व शेअर्सच्या किमती या दिनांक १५, जून २०२१ रोजी दुपारी २.०० ते २.१५ या वेळेतील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com