esakal | रिलायन्समध्ये जनरल अटलांटिक करणार 3675 कोटींची गुंतवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance Retail

रिलायन्समध्ये सध्या गुंतवणूक करत असलेली जनरल अटलांटीक ही गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठी इक्विटी फर्म आहे.

रिलायन्समध्ये जनरल अटलांटिक करणार 3675 कोटींची गुंतवणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मोठी गुंतवणूक होणार आहे. अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक (General Atlantic) 3675 कोटींची गुंतवणूक रिलायन्समध्ये करणार आहे. जवळपास 0.84 टक्क्यांची ही भागीदारी असणार आहे. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी मोठी आणि महत्वपूर्ण गुंतवणूक असणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची सबसिडिअरी रिलायन्स रिटेल देशभरात सर्वात मोठा रिटेल व्यवसाय चालवते. सध्या देशातील 7 हजार शहरांमध्ये १२ हजारहून अधिक रिलायन्सचे रिटेल स्टोअर्स आहेत. या स्टोअर्समुळे रिलायन्स रिटेलसोबत 640 मिलियन ग्राहक जोडले गेले आहेत. त्यामुळे या गुंतवणूकीचा करार हा रिलायन्ससाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. 

या गुंतवणुकीमुळे रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटीचे मूल्य हे 4.28 लाख कोटी रुपये होणार आहे. याआधी झालेल्या दोन करार झालेले आहेत, त्या करारानंतर प्री मनी इक्विटी मूल्य 4.21 लाख कोटी होते.

हेही वाचा - संतापजनक! हाथरस 'निर्भया'चा मृतदेह कुटुंबियांकडे न सोपवता पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

सध्या रिटेल व्यवसायात आघाडीवर असणाऱ्या अॅमेझॉन इंडिया आणि वॉलमार्टच्या मालकीच्या असणाऱ्या फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स साईटला टक्कर देण्यासाठी रिलायन्स समूह जगभरातील कंपन्यांशी असे करार करत आहे. रिलायन्स आपल्या तेल कंपन्या, टेलिकॉम इंडस्ट्री ते आरआयएल या त्यांच्या रिटेल बिझनेसमध्येही विस्तार करत आहे. आपल्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्स प्रयत्नशील आहे. 

रिलायन्समध्ये सध्या गुंतवणूक करत असलेली जनरल अटलांटीक ही गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठी इक्विटी फर्म आहे. या प्रायव्हेट फर्मचा गेल्या चाळीस वर्षांचा चांगला रेकॉर्ड आहे. आतापर्यंत या फर्मकडून आर्थिक सेवा, हेल्थकेअर आणि तंत्रज्ञान अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. जनरल अटलांटिक करत असलेल्या या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेल आपल्या व्यवसायात आघाडीवर राहिल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

हेही वाचा - बिहारचा रणसंग्राम : चर्चेनंतरही तिढा कायम

मे महिन्यातच 6598 कोटींची मोठी गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये करणार असल्याची घोषणा जीएने केली होती. या मोठ्या कराराविषयी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलंय की, आम्ही जनरल अटलांटिकशी आपले सख्य वाढवण्यात खुश आहोत. कारण आम्ही व्यापारी आणि आमच्या ग्राहकांना सबल बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. या साऱ्या प्रयत्नांमुळे भारतातील रिटेलमध्ये आमुलाग्र बदल होईल. जनरल अटलांटिकदेखील आमच्या या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. 

याबाबत जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड यांनी म्हटलंय की, डिजीटल इंडियाला सक्षम करण्याच्या उद्देशाने भारततल्या किरकोळ क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या या नव्या मोहिमेचे आम्ही स्वागत करतो. याबाबत जनरल अटलांटिक अत्यंत आनंदित आहे.