
‘रिलायन्स रिटेल’मध्ये गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘जीआयसी’ने १.२२ टक्के हिश्शासाठी ५५१२.५ कोटी आणि ‘टीजीपी’ने ०.४१ टक्के हिश्शासाठी १८३७.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या करारामुळे ‘रिलायन्स रिटेल’चे प्री-मनी इक्विटीचे मूल्य ४.२८५ लाख कोटी रुपये आहे. ही ‘रिलायन्स रिटेल’मधील सातवी गुंतवणूक असणार आहे.
नवी दिल्ली - ‘रिलायन्स रिटेल’मध्ये गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘जीआयसी’ने १.२२ टक्के हिश्शासाठी ५५१२.५ कोटी आणि ‘टीजीपी’ने ०.४१ टक्के हिश्शासाठी १८३७.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या करारामुळे ‘रिलायन्स रिटेल’चे प्री-मनी इक्विटीचे मूल्य ४.२८५ लाख कोटी रुपये आहे. ही ‘रिलायन्स रिटेल’मधील सातवी गुंतवणूक असणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘रिलायन्स रिटेल’ने आतापर्यंत २५ दिवसांत ७ गुंतवणूकदारांना ७.२८ टक्के भागीदारी देत ३२,१९७.५० कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. वर्षाच्या सुरवातीला, ‘टीपीजी’ने ‘रिलायन्स जिओ’मध्ये ४५४६.८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील ‘टीजीपी’ची ही दुसरी गुंतवणूक आहे.
‘लॉकडाउन’नंतर देशात निर्यात, करसंकलन, वाहनविक्री आणि उत्पादनवाढीचे आकडे सकारात्मक
भारतीय रिटेल क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी आणि लाखो व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रवासात ‘टीपीजी’चे स्वागत करीत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. ‘टीपीजी’चा समृद्ध अनुभव रिलायन्स रिटेल मिशनसाठी अनमोल सिद्ध होईल.
- ईशा अंबानी, संचालक, रिलायन्स रिटेल
Edited By - Prashant Patil