Godrej Group Share : 1 लाखाचे 6 कोटी, शेअरमध्ये आणखी तेजी येण्याचा अंदाज

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स हा असाच एक स्टॉक आहे, ज्याने 21 वर्षात 4 रुपये ते 1,072 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला आहे.
Godrej Consumer Products shares
Godrej Consumer Products sharesesakal

Godrej Consumer Products Shares : गोदरेज ग्रुपचे शेअर्स लाँग टर्मच्या दृष्टीने मजबूत परतावा देत असल्याचे समोर आले आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स हा असाच एक स्टॉक आहे, ज्याने 21 वर्षात 4 रुपये ते 1,072 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 21 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 6 कोटीपर्यंत वाढली असती.

Godrej Consumer Products shares
Share Market: फक्त 26,0000 रुपयांत गुंतवणूकदार कोट्यधीश! 5 वर्षांत 38000% परतावा

गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स ही एक लार्ज कॅप कंपनी आहे जिची मार्केट व्हॅल्यू 93,000 कोटी आहे, ही कंपनी एफएमसीजी इंडस्ट्रीशी संबंधित आहे. जवळपास 125 वर्ष जुन्या गोदरेज ग्रुप कंपनीकडे पर्सनल केअर आणि होम केअर प्रोडक्ट्सचा मजबूत पोर्टफोलिओ आहे. कंपनीने आतापर्यंत दोनदा बोनस शेअर्सही जारी केलेत.

Godrej Consumer Products shares
Share Market: आज गुंतवणूकदारांची चांदी, सेन्सेक्स 684 तर निफ्टी 171अंकावर

जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये प्रमोटर शेअरहोल्डिंग 63.22 टक्के, एफआयआय 24.03 टक्के, डीआयआय 6.05 टक्के आणि पब्लिक शेअरहोल्डिंग 6.70 टक्के आहे.

Godrej Consumer Products shares
Share Market : शेअर बाजारात घसरणीला मोठा ब्रेक; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला

शुक्रवारी एनएसईवर शेअर किरकोळ वाढून 907.80 रुपयांवर बंद झाला. 22 जून 2001 ला गोदरेजचा शेअर 4.10 रुपये होता. अशा प्रकारे स्टॉकने सध्याच्या किमतीनुसार सुमारे 22,000 टक्के परतावा दिला आहे.

Godrej Consumer Products shares
Share Market: शेअर बाजारात दिवसभरात घसरण; सेन्सेक्स 390 तर निफ्टी 109 अंकांवर

एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी अर्थात 21 वर्षांपुर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला कंपनीचे 24,390 शेअर्स मिळाले असते. त्यानंतर, कंपनीने 22 जून 2017 ला शेअरहोल्डर्सना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली. त्यावेळी शेअर्सची संख्या 48,780 पर्यंत वाढली असेल.

Godrej Consumer Products shares
Share Market: शेअर बाजाराची आज पुन्हा निराशाजनक सुरुवात; सेन्सेक्स 197 तर निफ्टी 52 अंकानी घसरला

जवळपास एक वर्षानंतर म्हणजे 12 सप्टेंबर 2018 ला कंपनीने पुन्हा 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले. म्हणजे दोन्ही बोनस इश्यूसह, शेअर्सची संख्या 73,170 पर्यंत वाढली असती आणि रिटर्न अमाउंटमध्ये मजबूत वाढ झाली असती. 22 जून 2001 ला ज्यांनी गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांची रक्कम आज सुमारे 6.64 कोटी रुपये झाली असेल.

Godrej Consumer Products shares
Share Market: शेअर बाजारात सकारात्मकता कायम; सेन्सेक्स 478 तर निफ्टी 140 अंकावर स्थिरावला

14 ऑक्टोबर 2021 ला शेअरने 1,072.20 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता आणि 8 मार्च 2022 रोजी 660.05 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. हा शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या खाली 15.33 टक्के आणि नीचांकी पातळीपेक्षा 37.53 टक्के व्यापार करत आहे.

Godrej Consumer Products shares
Share Market: शेअर बाजारात घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स, निफ्टी वधारला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com