सोन्याच्या भावात सलग पाचव्या दिवशी वाढ

Gold
Gold

सोन्याची चमक पुन्हा वाढली असून शुक्रवारी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या भावात ८१७ रुपयांची वाढ झाली. सोने प्रति दहा ग्रॅम ४७,५१३ रुपयांवर पोचले आहे. तर चांदीचा भाव ७३० रुपयांनी घसरून प्रतिकिलो ४७,७५५ रुपयांवर पोचला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशांतर्गत बाजारात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४७,३५१ रुपये झाला. त्यात ६३ रुपयांची घट झाली. तर  चांदी ८०९ रुपयांनी घसरली असून चांदीचा भाव प्रति किलो ४७,८३० रुपये प्रती किलोवर पोचला आहे.   

या वर्षात आतापर्यत सोन्याच्या भावात २१.०८ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

सोन्याच्या भावात वाढ का?
जागतिक अर्थव्यवस्थेत मरगळ आणि आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलरचे मजबूत होणे आणि कोविड-१९च्या प्रादूर्भावाची दुसरी लाट येण्याची भीती यामुळे सोन्याच्या मागणीत आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढ झाल्याने सोन्याच्या भावात वाढ होताना दिसते आहे. अमेरिकेच्या फेडरलने २०२२ पर्यत व्याजदर शून्याच्या जवळपास राखण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील बेरोजगारीत मागील आठवड्यात सुधारणा झाली असली तरी सद्य परिस्थिती अमेरिकेतील एकूण नोकरी गमावणाऱ्यांची संख्या २.०९ कोटींवर पोचली आहे.

सोने आणि चांदीचे गुणोत्तर ९९.४९ ते १ वर पोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,७२८ डॉलर ते १,७२० डॉलरच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था मंदावली आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवत आहेत.

भविष्यातदेखील सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. 

महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव
 
सोन्याला पसंती का?
-सोने संपत्तीचे प्रतिक मानले जाते.
-सोने उत्तम गुंतवणुकीचे साधन आहे.
-एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज सोपवता येते
- उच्च तरतला गुणधर्म

* सोने प्रति दहा ग्रॅम ४७,५१३ रुपयांवर
* चांदी प्रतिकिलो ४७,७५५ रुपयांवर
* गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवत आहेत
* सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com