
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राला मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत ३,२५५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने ९६९.२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीला ९,००५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राला मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत ३,२५५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने ९६९.२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीला ९,००५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला १३,८०८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. कंपनीच्या महसूलात ३५ टक्क्यांची घट झाली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
२०१९-२० या आर्थिक वर्षात महिंद्रा अँड महिंद्राला ७४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. कंपनीच्या नफ्यात ८६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ५,४०१ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला होता. कंपनीच्या नफ्यातील आणि महसूलातील घट वाहन आणि ट्रॅक्टर विभागातील विक्रीतील घट, बीएस-६ निकष आणि कोविड-१९ मुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे झाली आहे.
पिपल्स कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध
२०१९-२० या आर्थिक वर्षात महिंद्रा अँड महिंद्राचा महसूल १५ टक्क्यांनी घटून ४४,८६६ कोटी रुपयांवर आला आहे. त्याआधी आर्थिक वर्षात कंपनीला एकूण ५२,८४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा कार्यान्वित नफा २३ टक्क्यांनी घटून ५,४०२ कोटी रुपयांवर आला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ७,०११ कोटी रुपयांचा कार्यान्वित नफा मिळाला होता.
महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव
ट्रॅक्टरच्या श्रेणीत कंपनीचा बाजारातील हिस्सा १ टक्क्यांनी वाढला असून ३.५ टनांपेक्षा लहान एलसीव्हीमधील हिश्यात १.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ऑटो पीव्हीमधील हिस्सा मात्र ०.८ टक्क्यांनी घटला आहे.
...तर भारत 9.5 टक्के विकासदर गाठेल : फिच रेटिंग्स
कोविड-१९चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागणी आणि पुरवठा या दोन्हींवर मोठा परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. यातच भर म्हणून घालावलेले उत्पन्न आणि अनिश्चचितता यामुळे ग्राहकांच्या खर्चावर विपरित परिणाम झाला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.