esakal | शेअर बाजारात घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२५ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४०० पेक्षा जास्त अंशांची घसरण सकाळच्या सत्रात दिसून आली.

शेअर बाजारात घसरण

sakal_logo
By
पीटीआय

आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२५ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४०० पेक्षा जास्त अंशांची घसरण सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३३,४९० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,८९० अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एचडीएफसी बॅंक आणि इतर खासगी बॅंकांच्या शेअरच्या किंमतीत जवळपास २.२२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. एसबीआय लाईफ इन्श्युरन्सच्या शेअरच्या किंमतीत जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली आहे. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये १३.६२ टक्क्यांची घसरण झाली आहे. एजीआर शुल्कामुळे व्होडाफोन आयडियावरील दबाव वाढला आहे. 

महिंद्रा अँड महिंद्राला ३,२५५ कोटींचा तोटा

निफ्टी बॅंकसह इतर क्षेत्रनिहाय निर्देशांकावरही आज दबाव दिसतो आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील आगामी काळातील मंदावण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. कोविड-१९ मुळे कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २७३८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

पिपल्स कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात सकाळी घसरण झाली होती. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ०.०६ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.८४ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव

* सेन्सेक्स ३३,४९० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,८९० अंशांच्या पातळीवर 
* निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण