मुंबई शेअर बाजाराचा नवा विक्रम, सेन्सेक्स 'ऑल टाइम हिट'

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

विदेशी गुंतवणूक आल्याने आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 300 अंकाची वाढ होताच आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर तो पोहोचला.

मुंबई- भारतीय शेअर बाजारातील तेजीचा हंगाम अजूनही सुरु आहे. सेन्सेक्स रोज नव्या उंचीवर जाताना दिसत आहे. बुधवारीही सेन्सेक्सने पुन्हा एकदा उसळी घेतली. आतापर्यंतच्या सर्वोच्च अंकावर सेन्सेक्सने झेप घेतली. विदेशी गुंतवणूक आल्याने आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 300 अंकाची वाढ होताच आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर तो पोहोचला. यादरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि इन्फोसिससारख्या मोठ्या शेअर्समुळे सेन्सेक्स मजबूत झाला. सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 45,908.08 या विक्रमी स्तराला स्पर्श केल्यानंतर 285.62 अंकांनी वाढून 45,894.13 वर तो पोहोचला. 

त्याचबरोबर निफ्टी 78.25 अंकांनी वाढून 13.471.20 वर पोहोचला. यापूर्वी निफ्टीची सर्वोत्तम कामगिरी ही 13,475.05 होती. सेन्सेक्समध्ये सर्वात अधिक दोन टक्के तेजी ही आयटीसीमध्ये दिसून आली. त्याचबरोबर ओएनजीसी, टीसीएस, सन फार्मा, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह आणि एनटीपीसीचे शेअर्समध्येही तेजी होती. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुतीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

हेही वाचा- Jet Airways दोन वर्षांनी पुन्हा दिसणार आकाशात; नव्या मॅनेजमेंटची घोषणा

हेही वाचा- महागाईमुळे उज्ज्वला योजनेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; दर वाढताच गॅसचे बूकिंग घटले

मागील सत्रात सेन्सेक्स 181.54 अंकांनी वाढून 45,608.51 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टी 37.20 अंकांनी वाढून 13,292.95 वर पोहोचला होता. याचदरम्यान, आशियात शांघाई, हाँगकाँग, सियोल आणि टोकियोसारख्या शेअर मार्केटमध्येही तेजी दिसून आली होती.  

हेही वाचा- 'तेल' लावून या शेअर बाजारात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market update mumbai share market jumps sensex reaches all time high