esakal | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले
sakal

बोलून बातमी शोधा

gold rates

2020 च्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढतच आले आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात थोडी अस्थिरता आली होती. पण नंतर आता सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सध्या कोरोना संकटकाळात सोन्याचे भाव मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहेत. 2020 च्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढतच आले आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात थोडी अस्थिरता आली होती. पण नंतर आता सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (17) दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला  340 रुपयांनी वाढून 53,611 रुपये झाला आहे. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने  दिलेली आहे.  काल बाजार बंद होताना सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 53,271 रुपये होती. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही 1306 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदी आता प्रति किलो 69,820 रुपये झाली आहे, जी पहिले 68,514 रुपये होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1954 डॉलर तर चांदी 26.81 डॉलर प्रति औंस आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक परिस्थितींमुळे सोमवारी सोन्याच्या किंमती वाढल्या, असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं आहे.

हे वाचा - चर्चा चकाकत्या सोन्याची!

गेल्या आठवड्यात रशियाने कोरोना लस बनवल्याचा दावा केल्या नंतर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे बाजारात मोठी अस्थिरता आली होती. सध्या आलेली आर्थिक मंदी, अमेरिका आणि चीनमधील वाद आणि डॉलरमधील कमी झालेली किंमत यामूळे सोने-चांदीचे भाव अजून वाढतील, अस मत अर्थतज्ञांनी व्यक्त केलं आहे. शेअर बाजारामधील अनिश्चितता आणि  कोरोनाचा कहर हे सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास आकर्षित करीत आहेत  

हे वाचा - ...म्हणून कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत सोन्याचा भाव वाढतोय

एका आठवड्यात 4 हजार रुपयांनी घसरण
मागील आठवड्यात भारतातील सोन्याच्या किंमती कमी झाल्या होता.  गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 10 ग्रॅम 2600 रुपयांची घट झाली होती. 7 ऑगस्ट रोजी सोन्याने प्रति ग्रॅम 56,200 रुपयांचा नवीन उच्चांकही गाठला होता.  त्यानंतर सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4000 ने घसरली होती. तसेच चांदीही 5.5 टक्क्यांनी म्हणजे 4,000 रुपयांनी घसरुन 67,220 रुपये प्रतिकिलो झाली.  अमेरिकेत सरकारी बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्यानेही सोन्याच्या किंमती खाली येत राहिल्या, अस तज्ञांनी सांगितलं आहे.