Gold Silver Price: सोने 3 दिवसांत 1800 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही घट

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 25 November 2020

जागतिक बाजारातील बदलांमुळे आज सलग तिसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात घट झाली आहे.

नवी दिल्ली: जागतिक बाजारातील बदलांमुळे आज सलग तिसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे भाव 0.21 टक्क्यांनी घसरून 48 हजार 485 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर चांदीचे वायदे प्रति किलोला 59 हजार 460 रुपयांपर्यंत घसरले आहेत. मागील दोन दिवसांत भारतात सोने-चांदीच्या भावात कमालीची घट झाली होती.

तसेच बुधवारच्या सत्रात सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर यापूर्वी मंगळवारी ते 750 रुपयांनी स्वस्त झाल्याचे दिसले होते. दुसरीकडे चांदीच्या दरात मंगळवारी चांदी 1600 रुपयांनी घसरले होते तर मागील सत्रात चांदीचे दर 800 रुपयांनी प्रति किलो कमी झाले होते.

सरकारला मिळतो कर, पण सामान्यांच्या मागे लागते घरघर

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले दर-
जागतिक बाजारपेठेत सोने 0.1 टक्क्यांनी वाढून 1,809.41 डॉलर प्रति औंस झाले, जे मागील सत्रात 1,800.01 डॉलर होते. कमी झालेले हे दर 17 जुलैनंतरचे सर्वात कमी दर ठरले आहेत. डॉलर निर्देशांक आज इतर चलनांच्या तुलनेत 0.14 टक्क्यांनी घसरला आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर चलनधारकांचा फायदा झाला.

जगातील सर्वात मोठा ETF एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डींग सोमवारी 1,213.17 टन असणारे मंगळवारी 1.1 टक्क्यांची घसरण होऊन ते 1,199.74 टन राहिलेकोरोना लशींबद्दल सकारात्मक बातम्या येत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर कमॉडिटी मार्केटमध्ये मोठे चढउतार दिसत आहेत.

Covid 19 Impact: पुढील वर्षात 10 टक्क्यापर्यंत वाढणार NPA; रेटिंग एजन्सीचा अंदाज

भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार- 
भारतात 2020मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलरची होती. चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी लागतो.

भारताकडील सोन्याचा साठा- 
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Silver Price slumps heavy in national and international