Gold-silver Price: सोन्याचे भाव स्थिर तर चांदीच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या आजचे नवे दर

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं.
Gold silver price
Gold silver priceSakal

गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता होती. अशात या आठवड्याच्या सुरवातीला सोमवारी सोन्याचे दर स्थिर तर चांदीच्या दरात घट दिसून आली. आज सुद्धा सोन्याचे भाव स्थिर असून मात्र चांदीच्या दरात वाढ दिसतेय.

आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,000 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 552 रुपये आहे. (gold silver price update 13 september 2022)

Gold silver price
Gold Silver Price: सोने चांदीच्या दरात सलग तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 51,760 रुपये

दिल्ली - 51,150 रुपये

हैदराबाद - 51,000 रुपये

कोलकत्ता - 51,000 रुपये

लखनऊ - 50,150 रुपये

मुंबई - 51,000 रुपये

नागपूर - 51,030 रुपये

पूणे - 51,030 रुपये

Gold silver price
Gold rate : सोने ६० हजारांच्या पार जाणार

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold silver price
Gold Silver Price: सोने चांदीच्या दरात सलग तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com