Gold Rate: सोने खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! वीकेंडला सोनं घसरलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

Gold Rate : सोने खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! वीकेंडला सोनं घसरलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या कित्येक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र ऐन वीकेंडला सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48.740 रुपये तर 24 कॅरेट साठी 53,170 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 609 रुपये आहे. (gold silver price update 19 November 2022

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 54,000 रुपये

  • दिल्ली - 53,340 रुपये

  • हैदराबाद - 53,170 रुपये

  • कोलकत्ता - 53,170 रुपये

  • लखनऊ - 53,340 रुपये

  • मुंबई - 53,170 रुपये

  • नागपूर - 53,200 रुपये

  • पुणे - 53,200 रुपये

हेही वाचा: Gold Rate: सोन्याच्या दरात तेजी सुरुच, जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते