खरेदीसाठी उत्तम दिवस! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या नवे दर | Gold Silver Price | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold price

खरेदीसाठी उत्तम दिवस! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या नवे दर

Gold-silver Price: आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात सध्या प्रचंड अस्थिरता दिसून येत होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याचा दरात घसरण दिसून येत आहे. आजही सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,150 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 560 रुपये आहे.

हेही वाचा: Gold-silver Price: सणवारांमध्ये सोने-चांदीचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,600 रुपये

दिल्ली - 52,310 रुपये

हैदराबाद - 47,800 रुपये

कोलकत्ता -52,150 रुपये

लखनऊ - 52,310 रुपये

मुंबई - 52,150 रुपये

नागपूर - 52,150 रुपये

पूणे - 52,280 रुपये

हेही वाचा: Gold-silver Price: जन्माष्टमीच्या पर्वावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात