Gold Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज पुन्हा एकदा सोन्याचे दरात तेजी दिसून येत आहे.
gold silver price
gold silver pricesakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली मात्र आज पुन्हा एकदा सोन्याचे दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,010 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,210 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 580 रुपये आहे. (gold silver price update 23 september 2022)

gold silver price
Gold Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,010 रुपये

दिल्ली - 50,360 रुपये

हैदराबाद - 50,210 रुपये

कोलकत्ता - 50,210 रुपये

लखनऊ - 50,360 रुपये

मुंबई - 50,210 रुपये

नागपूर - 52,240 रुपये

पूणे - 52,240 रुपयेये

gold silver price
Gold Smuggling : देशभरात 'गोल्ड रश' कारवाई, फक्त मुंबईतच कोट्यवधींची गोल्ड बिस्कीटं जप्त

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

gold silver price
Gold-Silver Price: सोनं स्वस्त तर चांदी महागली, जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com