Gold Rate : मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

Gold Rate : मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या नवे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारीसुद्धा सोन्याच्या दरात घसरण दिसली आज सुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरुच असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढलाय.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,250 तर 24 कॅरेट साठी 52,640 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 610 रुपये आहे. (gold silver price update 24 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 53,410 रुपये

  • दिल्ली - 52,800 रुपये

  • हैदराबाद - 52,640 रुपये

  • कोलकत्ता - 52,640 रुपये

  • लखनऊ - 52,800 रुपये

  • मुंबई - 52,640 रुपये

  • नागपूर - 52,640 रुपये

  • पुणे - 52,640 रुपये

हेही वाचा: Gold Rate : सोन्याच्या दरात घसरण सुरुच! जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: Gold Rate : कार्तिक अमावस्येला सोनं स्वस्त! खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात