Gold-Silver Price: सोन्याच्या दरात वाढ सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold-Silver Price Update

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात वाढ सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

Gold-Silver price: आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीत मोठी घसरण दिसून येत होती. मात्र गुरुवारी या घसरणीला अखेर ब्रेक लागला आणि सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली. आजही सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात तेजी कायम आहे.

आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 554 रुपये आहे. (gold silver price update 27 august 2022)

हेही वाचा: Gold-silver Price: पोळ्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,800 रुपये

दिल्ली - 52,140 रुपये

हैदराबाद - 51,980 रुपये

कोलकत्ता -51,980 रुपये

लखनऊ - 52,140 रुपये

मुंबई - 51,980 रुपये

नागपूर - 52,010 रुपये

पूणे - 52,010 रुपये

हेही वाचा: Gold-silver Price: जन्माष्टमीच्या पर्वावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

हेही वाचा: Gold Import : सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Web Title: Gold Silver Price Update 27 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..