सोन्याच्या घसरणीला ब्रेक; दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

आज या घसरणीला ब्रेक लागला असून सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Todays Gold Silver Update
Todays Gold Silver Update sakal

Gold Silver Price Update: आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या दर स्थिर होते तर चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. त्यानंतर बुधवारपासून सोन्याच्या दरात सलग घसरण सुरू होती मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला असून सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,110 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,380 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 565 रुपये आहे. सोन्याच्या सलगच्या घसरणीला घसरणीला ब्रेक लागल्याने आज विक्रीचा जोर मंदावण्याची शक्यता आहे. (Gold silver price update 29 july 2022)

Todays Gold Silver Update
Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,000 रुपये

दिल्ली - 51,550 रुपये

हैदराबाद - 51,380 रुपये

कोलकत्ता - 51,380 रुपये

लखनऊ - 51,550 रुपये

मुंबई - 51,380 रुपये

नागपूर - 51,410 रुपये

पूणे - 51,410 रुपये

Todays Gold Silver Update
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold Silver Update
Gold price : आज देशभरात सोन्याचे दर स्थिर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com