Gold Rate : नव्या वर्षी अखेर सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर आहे.
Gold Silver Price
Gold Silver Pricesakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. नवीन वर्षानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढही दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर  50,450 तर 24 कॅरेट साठी 55,040 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 713 रुपये आहे. (Gold Silver Price Update 3 January 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 56,180 रुपये

  • दिल्ली - 55,200 रुपये

  • हैदराबाद - 55,040 रुपये

  • कोलकत्ता - 55,040 रुपये

  • लखनऊ - 55,200 रुपये

  • मुंबई - 55,040 रुपये

  • नागपूर - 55,040 रुपये

  • पुणे - 55,040 रुपये

Gold Silver Price
Golds 2020 Scheme : रतनलाल सी. बाफना ज्वेलस्‌मध्ये सोने खरेदीचे सर्वात स्वस्त 20 दिवस!

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Price
Gold-Silver Rate : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं 55 हजारांच्या पार; जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com