Gold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Silver Rate

Gold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता होती पण वीकेंड जवळ येताच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी सोन्याच्या दरात तेजी होती तर आज रविवारला सुद्धा सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,450 तर 24 कॅरेट साठी 53,950 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 652 रुपये आहे. (gold silver price update 3 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 54,720 रुपये

  • दिल्ली - 54,100 रुपये

  • हैदराबाद - 53,950 रुपये

  • कोलकत्ता - 53,950 रुपये

  • लखनऊ - 54,100 रुपये

  • मुंबई - 53,950 रुपये

  • नागपूर - 53,950 रुपये

  • पुणे - 53,950 रुपये

हेही वाचा: Stock Market : या स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, अडीच वर्षात तिप्पट परतावा...

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा: Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.