Gold-Silver Price: सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजची किंमत

देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,400 आहे, कालसुद्धा ही किंमत 47,400 रुपये होती.
Check Today's Gold Silver Price Updates
Check Today's Gold Silver Price UpdatesSakal

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात दररोज चढउतार होत असतात. आज म्हणजेच 8 मे रोजी देशात सोन्याचे दर स्थिर आहेत. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,400 आहे, कालसुद्धा ही किंमत 47,400 रुपये होती.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 51,700 रुपये आहे. कालसुद्धा ही किंमत 51,280 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold-Silver Price: सोनं महागलं,चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे दर

चांदीच्या भावात वाढ-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज एक किलो चांदीचा दर 62,500 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 62,500 होती. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 625 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com