Gold-Silver Price: सोनं महागलं,चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Check Today's Gold Price Updates
Gold-Silver Price: सोनं महागलं,चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price: सोनं महागलं,चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात दररोज चढउतार होत असतात. आज म्हणजेच 6 मे रोजी देशात सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,400 आहे, काल ही किंमत 47,000 रुपये होती. म्हणजेच 400 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 51,700 रुपये आहे. काल ही किंमत 51,280 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हेही वाचा: Gold price Updates: अक्षय तृतीयेला सोने खरेदी करतायं? जाणून घ्या दर

चांदीच्या भावात वाढ-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर लखनऊमध्येही चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 63,800 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 62,7000 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 1100 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: Gold-Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Web Title: Gold Silver Price Updates Today 6th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top