Gold Silver Price : व्हॅलेंटाइन डे ला चक्क सोनं स्वस्त! आता पार्टनरला द्या सोन्याच्या वस्तू गिफ्ट

आज व्हॅलेंटाईन दिवस असल्याने सोने चांदीच्या दरातील घसरण सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
Gold Silver Price
Gold Silver Pricesakal

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय तेजी दिसून आली होती मात्र आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज व्हॅलेंटाईन दिवस असल्याने सोने चांदीच्या दरातील घसरण सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 57,230 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 700 रुपये आहे. (Gold silver price Valentine Day Special 14 February 2023 )

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 58,210 रुपये

दिल्ली - 57,390 रुपये

हैदराबाद -57,240 रुपये

कोलकत्ता - 57,240 रुपये

लखनऊ - 57,390 रुपये

मुंबई - 57,240 रुपये

नागपूर - 57,240 रुपये

पूणे - 57,240 रुपये

Gold Silver Price
Gold Silver Price : बजेटनंतर सोनं चांगलंच महागलं; दर पाहून तुमच्याही अंगावर येणार काटा

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Silver Price
Gold Silver Rate : सोने, चांदीला झळाळी कायम; मागणीत वाढ

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com