सोने-चांदी महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.
Gold, Silver price Updates
Gold, Silver price UpdatesSAKAL

गेल्या कित्येक दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार दिसत असून सोन्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेट साठी ४७,७६०रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,१०० रूपये आहे तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२० रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

Gold, Silver price Updates
Gold-Silver Price: सोन्या-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजची किंमत

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - ५२,७६० रुपये

दिल्ली - ५२,१०० रुपये

हैदराबाद - ५२,१०० रुपये

कोलकत्ता -५२,१०० रुपये

लखनऊ - ५२,२५० रुपये

मुंबई - ५२,१०० रुपये

नागपूर - ५२,१५० रुपये

पूणे - ५२,१५० रुपये

Gold, Silver price Updates
Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ; जाणून घ्या आजची किंमत

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold, Silver price Updates
Share Market: शेअर बाजार सकारात्मक; सेन्सेक्स 201 तर निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह सुरु

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com