मंदीचा झटका : आयडीबीआय बॅंकेने घेतला 'हा' मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

केंद्र सरकारने 9,300 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यास मंजूरी दिल्यानंतर आयडीबीआय बॅंक आता आयडीबीआय फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीतील हिस्सा विकणार आहे. या विक्रीतून आणखी भांडवल उभारण्याचे बॅंकेचे प्रयत्न आहेत. या व्यवहाराच्या व्यवस्थापनासाठी बॅंकेने जेपी मॉर्गन इंडिया यांची नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 9,300 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यास मंजूरी दिल्यानंतर आयडीबीआय बॅंक आता आयडीबीआय फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीतील हिस्सा विकणार आहे. या विक्रीतून आणखी भांडवल उभारण्याचे बॅंकेचे प्रयत्न आहेत. या व्यवहाराच्या व्यवस्थापनासाठी बॅंकेने जेपी मॉर्गन इंडिया यांची नियुक्ती केली आहे.

मंदीचा तडाखा : आणखी एका कंपनीकडून 400 कामगारांना बाहेरचा रस्ता

जेपी मॉर्गने यासंदर्भात प्रस्ताव मागवले आहेत. आयडीबीआय बॅंकेची आयडीबीआय फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीत 48 टक्क्यांची मालकी आहे. तर फेडरल बॅंक आणि एजिस इन्श्युरन्स इंटरनॅशनल एनव्हीचा प्रत्येकी 26 टक्के हिस्सा आहे. एलआयसीने जानेवारी महिन्यात या व्यवसायातील 51 टक्के हिस्सा विकत घेतल्यानंतर आयडीबीआय बॅंकेला स्वत:ची यंत्रणा वापरून एलआयसीची उत्पादने विकावी लागत होती. त्यामुळे या उपक्रमातून बाहेर पडणे बॅंकेसाठी गरजेचे झाले होते.

जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये व्हिएन्ना पहिल्या तर दिल्ली आहे 'या' स्थानावर!

आयडीबीआय बॅंक आपला म्युच्युअल फंड व्यवसायसुद्धा विकण्याच्या प्रयत्नात आहे. बॅंकेच्या म्युच्युअल फंड व्यवसायाच्या व्यवस्थापनाखाली 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. बॅंक 2017 पासून आपल्या जीवन विमा व्यवसायात गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. मालमत्तेच्या निकषांवर आयडीबीआय बॅंक ही देशातील सर्वाधिक कमजोर बॅंक आहे.

शेअर बाजार अखेर सावरला

बॅंकेचे एकूण थकित कर्जाचे प्रमाण 29.12 टक्क्यांवर पोचले आहे. त्याखालोखाल युको बॅंकेचा नबंर लागतो. युको बॅंकेचे एकूण थकित कर्जाचे प्रमाण 24.85 टक्के इतके आहे. तर इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे प्रमाण 22.53 टक्के इतके आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IDBI Bank plans to sell stake in insurance joint venture IDBI Federal Life