जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये व्हिएन्ना पहिल्या तर दिल्ली आहे 'या' स्थानावर!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये नवी दिल्लीचे स्थान 6 क्रमांकाने घसरून 118व्या क्रमांकावर पोचले आहे. वाढती गुन्हेगारी आणि वाढते वायुप्रदुषण यामुळे नवी दिल्लीचे यादीतील स्थान घसरले आहे.
 

नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये नवी दिल्लीचे स्थान 6 क्रमांकाने घसरून 118व्या क्रमांकावर पोचले आहे. वाढती गुन्हेगारी आणि वाढते वायुप्रदुषण यामुळे नवी दिल्लीचे यादीतील स्थान घसरले आहे.

मंदीचा तडाखा

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने केलेल्या पाहणी अहवालात ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. आशियातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नवी दिल्लीच्या स्थानात सर्वाधिक घसरण झाली आहे. मुंबईचा क्रमांकदेखील दोन स्थानांनी घसरून 119व्या क्रमांकावर आला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नाने जगातील सर्वोत्तम शहराचा किताब पटकावला आहे. आशियातील शहरांच्या क्रमवारी घसरण झाली आहे. त्यातही पापुआ न्यू गिनीचे पोर्ट मोर्सबी (135), पाकिस्तानचे कराची (136) आणि बांगलादेशचे ढाका (138) ही या क्रमवारीत सर्वात खाली आहेत. इतर निकषांबरोबरच यावर्षी या पाहणी अहवालात हवामान बदलाचाही निकष वापरण्यात आला. भारताचे नवी दिल्ली आणि इजिप्तचे कैरो या शहरांचे जागतिक हवामान बदलांच्या संदर्भातील स्थान घसरले आहे.

भुजबळांच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेची प्रतिक्रीया

या यादीत व्हिएन्नाने 99.1 गुण मिळवले तर नवी दिल्लीला 56.3, मुंबईला 56.2 गुण मिळाले आहेत. सर्वात कमी म्हणजे 30.7 गुण सिरियाची राजधानी दमास्कसला मिळाले आहे. नवी दिल्ली हे जगातील सर्वाधिक सहा प्रदुषित शहरांपैकी एक आहे. चीनमधील सुझाऊ 75 व्या, बिजिंग 76 व्या, तिआनजिन 79व्या, शांघाय 80व्या, शेन्झेन 84 व्या, दालिआन 90व्या, गुआनझाऊ 96 व्या आणि क्विंगडाओ 97 व्या क्रमांकावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vienna remains the world’s most liveable city