चुकीच्या खात्यात पैसे झाले ट्रान्सफर? काळजी करू नका, या स्टेप्स फॉलो करा...

तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर काळजी करू नका.
online banking
online bankingsakal

वाढत्या डिजिटायझेशनमुळे लोकांना काही वेळा काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. UPI, नेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करताना अनेकदा घाईगडबडीत चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. तुमच्याकडून कधी अशी चूक झाली तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

online banking
Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी नेट बँकिंग वापरता तेव्हा पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी आणि फोनवर मेसेज येतो. इमेल आणि मेसेज तपासल्यावर तुम्ही कोणत्या खात्यात आणि किती रक्कम पाठवली हे कळेल. या दरम्यान जर तुमच्या लक्षात आले की तुम्ही चुकीच्या नंबरवर पैसे पाठवले आहेत किंवा खाते क्रमांक चुकीचा आहे तर काळजी करू नका. अशावेळी ताबडतोब तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती द्या.

online banking
'हा' मल्टीबॅगर स्टॉक फक्त एका महिन्यात 40% वाढला, आणखी तेजी येण्याची शक्यता

बँकिंग व्यवहारांमध्ये, खाते क्रमांक, IFSC कोड किंवा दोन्ही टायपिंग त्रुटीमुळे ही समस्या उद्भवल्याचे दिसून येते. काही वेळा तांत्रिक बिघाडामुळेही असे घडते. जर अस्तित्वात नसलेल्या खाते क्रमांकावर पैसे पाठवले गेले तर तुमचे पैसे आपोआप परत मिळतील. पण, जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर तुम्ही बँकेच्या मदतीने ठरवलेल्या नियमांनुसार पैसे काढू शकता. अशात बँकेच्या बाजूने काही टाळाटाळ केली जात असेल तर आपण त्याबद्दल बँक लोकपाल म्हणजेच बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता.

online banking
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दराबाबत ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या आजचे दर

सगळ्यात आधी हे काम करा

सगळ्यात आधी, तुम्ही लवकरात लवकर बँकेला चुकीच्या व्यवहाराची माहिती द्या. ज्या खात्यात पैसे चुकून ट्रान्सफर झाले असतील, ज्या खात्यात तुम्ही पैसे ट्रान्सफर करणार होता, त्या दोन्ही खातेधारकाचे नाव तेच असेल, तर तुम्हाला याचा पुरावा द्यावा लागेल. संपूर्ण प्रकरणाची माहिती एका मेलद्वारे बँकेला द्या आणि या प्रक्रियेचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवा.

अशा प्रकारे पैसे बँकेत परत येतील

बँक तुम्हाला ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले आहे त्या शाखेचे नाव आणि संपर्क क्रमांक देऊ शकते. तुम्ही ज्या खात्यात पैसे पाठवले आहेत ती व्यक्तीही त्याच बँकेची ग्राहक असल्यास, बँक तुमच्या वतीने त्यांच्याशी संपर्क साधेल आणि पैसे परत पाठवण्याची विनंती करेल. लाभार्थी सहमत असल्यास, 7 दिवसांत (7 working days) पैसे तुमच्या खात्यात परत केले जातील. जर लाभार्थी इतर कोणत्याही शाखेचा असेल, तर तुम्हाला स्वतः त्या शाखेत जाऊन बँक मॅनेजरशी बोलून तोडगा काढावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com