Gita-Gopinath
Gita-Gopinath

घसरलेल्या उत्पन्नामुळे भारताच्या विकासदरात घट होणार

वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०१९-२० या वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर घटवून ४.८ टक्‍क्‍यांवर आणला आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्रातील (एनबीएफसी) अडचणी आणि ग्रामीण भागातील घसरलेले उत्पन्न याचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे विकासदरात घट होणार असल्याचे मत ‘आयएमएफ’ने व्यक्त केले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या होऊ घातलेल्या वार्षिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘आयएमएफ’ने जागतिक अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यात भारताचा विकासदर ४.८ टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. भारताचा विकासदर २०२०-२१ मध्ये ५.८; तर २०२१-२२ मध्ये ६.५ टक्के असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘आयएमएफ’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ असलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी ही माहिती दिली. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे चीनचा विकासदर २०२०-२१ मध्ये सहा टक्के असेल, असेही त्यांनी सांगितले. 

२०२०-२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबाबत अनिश्‍चितता कायम असल्याचे सांगत अर्जेंटिना, इराण, तुर्की, ब्राझील, भारत आणि मेक्‍सिको या देशांच्या अर्थव्यवस्थांच्या कामगिरीवरच ते अवलंबून असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

४९ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक
नवी दिल्ली - सर्वाधिक थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये भारताने पहिल्या दहांत स्थान मिळवले आहे. 

भारताने २०१९ मध्ये ४९ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करण्यात यश मिळवले. दक्षिण आशियातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातून ही माहिती समोर आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेंड मॉनिटर अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०१९ मध्ये जागतिक पातळीवर थेट परकी गुंतवणुकीत फारशी तेजी दिसून आली नाही. एफडीआयची स्थिती जैसे थे राहिली. जगभरात १.३९ लाख कोटी डॉलरची थेट परकी गुंतवणूक झाली. २०१८ च्या तुलनेत त्यात एक टक्‍क्‍याची घट झाली.

व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेला तणाव; जागतिक अर्थव्यवस्थेची कामगिरी आणि धोरणांमधील अस्थिरता यांचा परिणाम परकी गुंतवणुकीवर झाला. विकसनशील देशांत जगातील निम्मी गुंतवणूक झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com