PM Kisan: अपात्र उमेदवारही घेत होते योजनेचा लाभ, कारवाईच्या भीतीने परत केली रक्कम

अपात्र असूनही अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते
PM Kisan:
PM Kisan:sakal

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित असतात. मात्र काही ठिकाणी या योजनेसाठी अपात्र होऊनही शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते. ही बाब आता केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने त्यांनी कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली. कारवाईच्या भीतीने चक्क अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत केल्याची बाब समोर आली आहे (Fake farmers are returning money from pm kisan yojana for scared of action)

PM Kisan:
Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

उत्तर प्रदेशातील बनावट आणि अपात्र शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत केली आहे. उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवून त्यांना रक्कम परत करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यावर कारवाई होणार, या भीतीनेच अपात्र शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत केली आहे. विशेष म्हणजे इनकम टॅक्स भरणारेही किसान सन्मान निधीही घेत होते.

PM Kisan:
Textile सेक्टरमधील 'हा' शेअर देईल दमदार परतावा

पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Scheme 2022) अंतर्गत केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करत आहे. किसान सहाय्यता निधीच्या अंतर्गत दरवषी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची रक्कम आर्थिक सहाय्यता म्हणून दिली जाते. ही रक्कम सरकार तीन हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात 4-4 महिन्यांनी जमा करते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये जमा केले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com