Textile सेक्टरमधील 'हा' शेअर देईल दमदार परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

Textile सेक्टरमधील 'हा' शेअर देईल दमदार परतावा

शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्हाला चांगला नफा कमवायचा असेल तर दमदार शेअर्समध्ये गुंतवणूक गरजेची आहे. कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मार्केट एक्सपर्ट्सच्या सल्ल्याने तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवू शकता. अशात मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी एका शेअर्सबाबत विश्वास व्यक्त केला आहे. (Banswara Syntex Ltd's share in textile sector will give strong returns)

त्यांनी टेक्सटाईल सेक्टरमधून बांसवारा सिंटेक्स लिमिटेडची (Banswara Syntex Ltd) निवड केली आहे. गुंतवणूकदार या टेक्सटाईल स्टॉकमधून येत्या काळात चांगला परतावा कमवू शकतात असा विश्वास संदीप जैन यांना आहे. 225-250 रुपयांमध्ये हा शेअर खरेदीसाठी चांगला असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 866, तर निफ्टी 271 अंकांनी कोसळला

बांसवारा सिंटेक्स लिमिटेड (Banswara Syntex Ltd)

सीएमपी (CMP) - 264 रुपये

टारगेट (Target) - 300/320 रुपये

बांसवारा सिंटेक्स लिमिटेडच्या (Banswara Syntex Ltd) स्टॉकमध्ये लाँग टर्मुमसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात असे बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी सांगितले. ही कंपनी 1976 पासून कार्यरत आहे. सध्या हा स्टॉक 10 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. गेल्या 3 वर्षातील नफ्याचा CAGR 19-20 टक्के आहे.

मार्च 2020 मध्ये कंपनीने 19 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. तर मार्च 2021 मध्ये कंपनीने 17 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. हा स्टॉक नुकताच वरील स्तरावरून करेक्ट झाला आहे आणि 264 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारीही चांगली असून विदेशी आणि देशी संस्थागत गुंतवणूकदारांनीही त्यात पैसे गुंतवले आहेत.

हेही वाचा: कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: This Share In Textile Sector Will Give Strong Returns Check Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top